Mopa Airports Jobs  Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळाची कॅलिब्रेशन चाचणी सुरू

विमानतळावरून पहिले उड्डाण 15 ऑगस्ट रोजीच

दैनिक गोमन्तक

मोरजी: मोपा विमानतळावरून पहिले उड्डाण 15 ऑगस्ट रोजी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतल्यानंतर सध्या धावपट्टीवर विमान उड्डाण कसे होईल, आणि विमान कसे उतरले जाईल, शिवाय सिग्नल कसे मिळतील, याची सध्या प्रात्यक्षिके केली जात आहेत. ( The calibration test of Mopa airport has started )

दोन दिवसापासून मोपा विमानतळावरून एक विमान घिरट्या घालत असल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले आहे. यासंदर्भात कंपनीचे शानभोगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सध्या कॅलिब्रेशन चाचणी सुरू आहे. शिवाय विमान उड्डाण केल्यानंतर एखाद्या झाडामुळे अडथळा येतो, का सिग्नल मिळतात की नाही, याची पाहणी सुरू आहे.

स्थानिकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच

या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीण या प्रकल्पासाठी दिली आहे. अशा शेतकऱ्यांना येथे नोकरी मिळणे अपेक्षित असताना त्या मिळत नसल्याचं आरोप स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमिवर मोपा विमानतळ प्रकल्पात आतापर्यंत दिलेल्या सुमारे पाचशे नोकऱ्या केवळ पेडणे तालुक्यातील व्यक्तींना दिल्या आहेत का ? अशी चर्चा सध्या पेडणे तालुक्यात सुरू आहे.

त्या नोकऱ्या बहुतांश प्रमाणात पेडणे तालुक्याच्या बाहेरील लोकांनाच देण्यात आल्याचा दावा या विमानतळासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT