Vikas Bhagat

 

Dainik Gomantak 

गोवा

नोकरी विक्री घोटाळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री कवळेकारांचा ऑडिओ लीक !

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर (Deepak Pauskar) यांनी नोकरी घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : भाजप सरकारने स्वताच्या आयटी सेलच्या कर्मचाऱ्याला आणि नेत्यांच्या नातेवाईकांना नोकऱ्या दिल्याचा पर्दाफाश करत गोवा फॉरवर्ड पक्षाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर (Deepak Pauskar) यांनी नोकरी घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या (Goa Forward Party) पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत यांनी सोमवारी मडगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, भाजपने (Bjp) बॅनर लावण्यासाठी गरीब कार्यकर्त्यांचा वापर केला आणि श्रीमंत नेत्यांच्या नातेवाईकांना नोकऱ्या दिल्या.

“आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नोकऱ्यांसाठी निवडलेल्यांची छाननी केली आहे. एक विशब विनोद धोंड, ज्यांचे शैक्षणिक निकाल खराब आहेत, त्यांची कनिश्ट अभियंता पदासाठी निवड झाली आहे. भाजपच्या आयटी विभागाचा कर्मचारी अपर्णा गावस देसाई यांची टीए पदासाठी निवड झाली आहे. भाजपचा कोणता नेता पहिल्या उमेदवाराचा नातेवाईक आहे हे सर्वांना माहीत आहे.” असे भगत म्हणाले.

भगत म्हणाले की, त्यांनी या उमेदवारांचे महाविद्यालयीन रेकॉर्ड तपासले असून त्यांना शैक्षणिक गुण कमी मिळाल्याचे आढळून आले आहे. "परीक्षेत फेरफार करून त्यांना निवडलेल्या यादीत स्थान मिळाले आहे." असे तो म्हणाला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री पाऊसकर यांना आव्हान देताना त्यांनी जागृत देवस्थान दुधसागर आजोबा पुढे येवून आरोप फेटाळण्याचे धाडस केले पाहिजे असे म्हटले. ‘ त्यांनी नोकरीसाठी पैसे घेतले नाहीत हे तिथे सांगावे. जर त्याने तसे केले तर मी राजकारण सोडेन." असे भगत म्हणाले.

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Kavlekar) हे नोकऱ्या विकल्या गेल्याचे एका ऑडिओ टेपमध्ये सांगत असल्याचे स्पष्ट कळत असल्याचे ते म्हणाले. ‘त्यांना त्यांच्या खात्यातून इतर मंत्र्यांना नोकऱ्या द्याव्या लागतात असे ते ह्या ऑडियो क्लिप मध्ये म्हणतात. ‘ही ऑडिओ क्लिप आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवू.’ असे भगत म्हणाले. मुख्यमंत्रीही नोकऱ्यांसाठी लाच घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT