Valpoi unsanitary  Gomantak Digital Team
गोवा

Goa Municipal : वाळपई पालिका उद्यानामागील परिसर गलिच्छ

सर्वत्र घाणीचे साम्राज्य : वाहनांसह अनेक भंगार वस्तू पडून, स्वच्छतेच्या उपक्रमांचे तीन तेरा

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई : ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत वाळपई शहरात स्वच्छता राहण्यासाठी पावले उचलली जात आहेत. मात्र पालिकेच्या उद्यानामागील परिसराची दयनीय अवस्था झाली आहे,त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. बहुचर्चित ‘स्वच्छ भारत अभियान’ला वाळपईत वाकुल्या दाखवणारी स्थिती दिसत आहे.

वापरलेल्या कचरापेट्या आणि कचरा सर्वत्र विखुरला आहे. गेली अनेक वर्षे साठवलेल्या भंगार वस्तूंसह, येथे टाकून दिलेले भंगार साहित्य यामुळे परिसर गलिच्छ दिसत आहे. ‘स्वच्छ भारत,नितळ गोंय’ अभियानाची ही थट्टाच आहे,अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

एका बाजूने दयनीय अवस्था आहे, तर दुसऱ्या बाजूने वाळपई शहराच्या विकासाच्या उद्देशाने, वाळपईचे आमदार, विश्वजित राणे सध्याच्या जीर्ण अवस्थेतील बागेत मोठा बदल करुन सौंदर्यीकरण करण्यासाठी कोटीचे प्रकल्प आणत आहेत.काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाची पायाभरणीही केली. तरीही, सध्या या उद्यानामागील देखावा तसाच आहे.

या परिसरात उद्यानाच्या बाजूला सार्वजनिक शौचालय आहे, तसेच चिकन विक्रेते आहेत. आणि त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. हा बालोद्यान परिसर सार्वजनिक ठिकाणांपैकी एक आहे. या

परिसराची साफसफाई टिकवून ठेवणे पालिकेची जबाबदारी आहे. या ठिकाणी कित्येक काळापासून भंगार ठेवण्यात आले आहे. योग्य नियोजन करून हे भंगार हटविले पाहिजे.तसेच टाकून दिलेल्या कचरा पेट्या, टायर, भंगार साहित्य आदिंमुळे ये-जा करणाऱ्यांना डोळ्यात खुपते आहे.

या संबंधी पालिकेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. भंगारात टाकलेले साहित्य चोरीला गेल्याचीही माहिती आहे.

भंगार कधी हटणार ?

एका नागरिकाने सांगितले की, या उद्यानाची काही दिवसांपूर्वी पायाभरणी झाली आहे. त्यामुळे आता लवकरच प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे. मात्र उद्यानामागे असलेले भंगार कधी हटणार हे कळत नाही. उद्यानामागे असलेला नालासुध्दा प्रदुषित झाला आहे. बाजूला असलेल्या चिकन विक्रीच्या दुकानांमुळे दुर्गंधी पसरून परिसर दुषित होत आहे. त्यामुळे ह्या उद्यानाचे सौंदर्यीकरण केले तरी घाणीचे साम्राज तसेच रहाणार का, असा प्रश्‍न आम्हाला पडतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: सावर्शे सत्तरी येथे मुख्य रस्त्यावर आंब्याचे झाड पडून रस्ता वाहतुकीस बंद

Goa Dams: ‘साळावली’, ‘अंजुणे’ची होणार दुरुस्‍ती! 58 कोटींचा निधी मंजूर; DPR तयार

Goa Politics: खरी कुजबुज; हाऊस फूल इस्पितळ

Goa Bad Roads: 1400 कोटी खर्च, पण रस्त्यावर खड्डेच; 'बीजेपीचे बुराक' मोहिमेत पालेकरांची टीका; रस्त्यांवर बसून केले आंदोलन

SCROLL FOR NEXT