Goa Beach Shack Dainik 'Gomantak
गोवा

Goa Shacks: नुकसान भरपाई मागणीवरून शॅकमालकांत पडले दोन गट

Goa Shacks: ऑल गोवा शॅक ओनर्स असोसिएशन या व्यवसायात झालेल्‍या दोन महिन्‍यांच्‍या नुकसान भरपाईची मागणी पर्यटन विभागाकडे लवकरच करणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Shacks: ऑल गोवा शॅक ओनर्स असोसिएशन या व्यवसायात झालेल्‍या दोन महिन्‍यांच्‍या नुकसान भरपाईची मागणी पर्यटन विभागाकडे लवकरच करणार आहे. मात्र या प्रश्‍‍नावरून राज्‍यातील शॅकमालकांमध्ये फूट पडली आहे.

याबाबत ऑल गोवा शॅक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांच्या विलंबानंतर आता शॅक उभारण्यात आले आहेत.

मात्र पर्यटन हंगामातील दोन महत्त्‍वपूर्ण महिने वाया गेले. त्‍यामुळे आमचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही भरपाई मिळावी यासाठी लवकरच पर्यटन विभागाला निवेदन देण्‍यात येईल.

तर, गोवा पारंपरिक शॅकमालक संघटनेचे नेते मान्यूएल कुलासो यांनी सांगितले की, उत्तर गोव्‍यात बहुतांश किनाऱ्यांवर शॅकची उभारणी करण्‍यात आलेली आहे.

चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना सरकारने अद्याप नुकसान भरपाई दिलेली नाही. त्‍यामुळे शॅकमालकांनी पर्यटन विभागाकडून नुकसान भरपाई मागणे म्‍हणजे माझ्या मते वेळेचा अपव्यय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT