Melavali Agitation

 

Dainik Gomantak 

गोवा

गुळेलीत पंचायत सचिव आला पण...

आज पाचव्या दिवशीही मेळावलीवासीयांचे आंदोलन (Melavali Agitation) सुरुच असून महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आज लाभली होती.

दैनिक गोमन्तक

गुळेली: आज पाचव्या दिवशीही मेळावलीवासीयांचे आंदोलन (Agitation) सुरुच असून महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आज लाभली होती. पंच ,सरपंच कोणीही पंचायत कार्यालयात फिरकत नसून पंचायत सचिव तसेच लिपिक सुट्टीवर असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या पंचायतीमध्ये एकमेव शिपाई दररोज उपस्थित राहत आहे.दरम्यान काल पासून आंदोलनकर्त्या तर्फे बिडीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत होता त्यात त्यांना उद्या 24 रोजी पंचायत सचिवांच्या बदलीवर कुणाला तरी पाठवण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते अशी माहिती आंदोलनातील विठू नाईक यांनी दिली. पण आज दुपारीच पंचायती मध्ये बदली सचिव पाठवण्यात आला.त्याच्याशी आंदोलन समितीच्या सदस्यांनी चर्चा करुन आपल्या मागण्या सादर केल्या आहे यावर सदर बदली सचिव काय निर्णय घेतात याकडे आंदोलनकर्त्या चे लक्ष लागले आहे की 19 डिसेंबर प्रमाणे सदर सचिवही एका दिवसाचाच ठरेल का? असा प्रश्न आंदोलन समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

गुळेली पंचायतीच्या सचिवाकडे अन्य एका पंचायतीची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांच्या जागेवर 19 रोजी असलेल्या ग्रामसभेवेळी दुसऱ्या ठिकाणच्या सचिवांना पाठवण्यात आले होते आणि आज या पंचायतीचे सचिव रजेवर असल्याने त्यांच्या जागी तिसराच माणूस पाठवण्यात आला आहे.त्यामुळे हा सर्व काय प्रकार आहे हे कळण्यास वाव नाही अशी प्रतिक्रिया मेळावली ग्रामस्थांनी दिली आहे. आज महिलांनी पंचायत कार्यालयात असलेल्या शिपायाला एकूण पंच, सरपंच, सचिव , लिपिक यांच्या गैरहजरीविषयी विचारलं असता आपणाला काही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT