Financial Scam Dainik Gomantak
गोवा

Financial Scam: आर्थिक घोटाळा करून अनेक महिने पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या

ओल्ड गोवा पोलिस आणि बेळगावी हुक्केरी सर्कल पोलिसांनी केली कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटक आणि गोवा येथे 80 लाखांची फसवणूक करून अनेक महिने पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपी महेश परसप्पा गुडली (वय 34 वर्ष रा. जमखंडी-बागलकोट, कर्नाटक) याला अखेर पोलिसांनी आज शांताबन, मेरशी- पणजी येथे पकडले.

सदर आरोपी सप्टेंबर 2022 पासून कर्नाटकातील त्याचे राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. यासाठी त्याने गोव्यात वास्तव्य करायला सुरुवात केली होती.

पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली हाती. मात्र तो सतत आपली राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता. अखेर तो गोव्यात असल्याचे समजल्यावर कर्नाटक पोलिसांनी ओल्ड गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कारवाई सुरू केली.

ओल्ड गोवा पोलिस आणि बेळगावी हुक्केरी सर्कल पोलिसांसह केलेल्या संयुक्त कारवाईत आज महेश गुडली याला शांताबन, मेरशी- पणजी येथे पकडण्यात पोलिसांना यश आलंय. त्याच्यावर 168/2022 आयपीसी कलम 420, 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पर्यटन हवयं, मृत्यूचा नंगानाच नको! गोव्यातील क्लब, पब्जसाठी ठोस कायद्याची गरज; 'करमणुकीचा कार्यक्रम' ही पळवाट बंद करा- संपादकीय

'इंडिगो'चा अहंकार अन् केंद्राचे लोटांगण! नियम मोडल्याने देशातील लाखो प्रवाशांना 'मनस्ताप'; सरकारवरही ओढावली नामुष्की-संपादकीय

Goa Crime: 'तलवार बाळगणे म्हणजे प्रतिबंधित शस्त्र नव्हे'! कोर्टाने केली दोन आरोपींची सुटका; पोलिसांचे फेटाळले आरोप

U-11 National Championships: बडोद्यात गोव्याचा डंका! 9 वर्षांच्या अमायरा धुमटकरने राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पटकावले 'ब्राँझपदक'

Cooch Behar Trophy: लाखमोलाची आघाडी! बंगालविरुद्ध अनिर्णित लढत; गोव्याच्या U-19 संघाने पहिल्या डावातील 27 धावांच्या जोरावर गाठली बाद फेरी

SCROLL FOR NEXT