Omicron Testing: राज्यातील नमुने जीनोम सिक्वेन्ससाठी Dainik Gomantak
गोवा

Omicron Variant in Goa: गोव्यातील नमुने जीनोम सिक्वेन्ससाठी पुण्यात

‘ओमिक्रॉन’चा देशात शिरकाव; कर्नाटकात दोन रुग्ण सापडले

दैनिक गोमन्तक

पणजी: जगभरात हाहाकार उडवलेला आणि दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या (COVID-19) नव्या व्हेरियंटचे 2 रुग्ण बंगलोरात (Karnataka) सापडल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण मिळत आहेत तेथील नमुने जीनोम सिक्वेन्ससाठी पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

विमानतळ आणि रेल्वे प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात येत असून बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी संबंधित देशांमध्येच व राज्यात उतरल्यानंतर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे, अशी माहिती कृती दलाचे सदस्य डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली आहे.

मुंबईत 10 संशयित

मुंबईतही 10 संशयित रुग्ण आढळले असून त्यांच्या नमुन्यांच्या जनुकीय आराखड्याचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेसह जोखीम असलेल्या इतर देशांतून आलेल्या 485 प्रवाशांच्या चाचण्या मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आल्या त्यापैकी नऊ प्रवासी व कोरोनाबाधितांच्या संपर्कातील एक असे एकूण 10 जण ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत.

संपर्कात आलेल्यांची ओळख पटली

‘ओमिक्रॉन’ची लक्षणे आढळलेले दोन्ही प्रवासी 11 व 20 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतून बंगळूरला आले होते. त्यांच्यातील लक्षणे सौम्य असली तरी नव्या प्रकाराची घातकता लक्षात घेऊन त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची ओळख पटविण्यात आली असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या दोघांशिवाय एका परदेशी नागरिकाच्या चाचणीत याच प्रकाराची लक्षणे आढळली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT