AAP: Arvind Kejriwal in Goa Dainik Gomantak
गोवा

'आप' च्या सर्व उमेदवारांची पक्षांतर, भ्रष्टाचार न करण्याची ग्वाही

सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याची शपथ

दैनिक गोमन्तक

AAP: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते सध्या प्रचारासाठी गोव्यात येत आहेत. 'आम आदमी पार्टी'ने आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून अमित पालेकर (Amit Palekar) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मध्यंतरी 'आप'चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) ही गोव्यात प्रचारासाठी आले होते. पुन्हा ते गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

'आप'चे आमदार पक्षांतर करणार नाहीत!

गोव्याच्या राजकारणातील पक्षांतर संपूर्ण देशभर गाजले. यामध्ये प्रामुख्याने कॉंग्रेसच्या आमदारांनी जास्त पक्षांतर केल्याने कॉंग्रेसला (Congress) सर्वाधिक टीकांचा सामना करावा लागला. त्यामुळेच ठोस पावले उचलत कॉंग्रेसच्या सर्व उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत मंदिर-मस्जिद आणि हॉली क्रॉससमोर जाऊन निवडणुकीनंतर (Goa Elections 2022) पक्षांतर न करण्याची शपथ घेतली होती. यासंदर्भात 'आप'चे अमित पालेकर यांनी एका खाजगी वाहिनीशी मुलाखत देताना पक्षांतराबद्दल आपले मत व्यक्त केले. गोव्यात पक्षांतराबद्दल कठोर नियम लागू झालेच पाहिजेत, असे ते म्हणाले होते. तेवढ्यातच आज अरविंद केजरीवाल यांनी सर्व 'आप'च्या सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याची कागदोपत्री शपथ घेतली आहे. उमेदवारांच्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सह्या घेऊन पक्षाशी प्रामाणिक राहण्याची ग्वाही प्रत्येकाकडून घेण्यात आली आहे.

आम्ही भ्रष्टाचार करणार नाही...

'आप'चे मूळ उद्दिष्टच भ्रष्टाचाराचा समूळ नाश करणे हा आहे. यासाठीच त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेद्वारे सर्व उमेदवारांकडून भ्रष्टाचार न करण्याची आणि कधीही लाच न घेण्याची शपथ घेतली आहे. ते म्हणाले, 'गोव्याच्या जनतेसाठी आम्ही स्टँम्प पेपरवर आम्ही भ्रष्टाचार करणार नसल्याचं लिहून देणार. गोव्याच्या 18 लाख लोकांमधून आम्ही आमचे उमेदवार निवडले आहेत. काँग्रेसने गोव्यावर 25 वर्ष राज्य केलं आहे. त्याबरोबरच भाजप (BJP) हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे. भाजपच्या मंत्र्यांनी कचऱ्यात, नोकऱ्यांमध्ये घोटाळा केला आहे. आणि आता ही जनतेला कळून चुकले आहे. आज गोव्यात फक्त भाजप आणि आप हे दोनच पर्याय आहेत. भाजपला लोकांनी संधी दिली होती, पण त्यांनी ती संधी दवडली आहे. गोव्यामध्ये आप जिंकल्यास आम्ही गोवाकरांना स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार देणार आहोत. आम्ही कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी करणार नाही. आम्ही आमचे सर्व उमेदवार चांगले आणि स्वच्छ प्रतिमेचे दिले आहेत. '

अमित शाहांच्या दिल्लीतल्या घरी 'आप' सरकारतर्फेच मोफत वीज!

दरम्यान, अमित शाह (Amit Shah) यांनी गोवा दौऱ्यावेळी आप आणि तृणमूलवर टीका केली होती. बाहेरचे पक्ष इथे गोव्यात अनेक गोष्टी मोफत देण्याची खोटी आश्वासाने देतात, असे अमित शाह म्हणाले होते. त्यांच्या या व्यक्तव्यावरून केजरीवालांनी अमित शाहांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ' अमित शाहांनी दुसऱ्यांवर टीका करण्याआधी स्वत:च्या दिल्लीतल्या घरी जाऊन आपले वीजबिल पहावे. त्यांच्या घरी आमच्याच सरकारतर्फे मोफत वीज जाते. त्यामुळे आता ज्या दिवशी निवडणुकांचे निकाल हाती येतील, त्या दिवशी अमित शाहांना धक्का बसेल.' केजरीवालांनी गोवेकरांना यावेळी विचार करून मतदान करण्याची विनंती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT