Accident in Goa
Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Accident In Curchorem: कुडचडे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात! एक दुचाकीस्वार गंभीर जखमी

दैनिक गोमन्तक

कुडचडे येथील सोनू कामत हॉस्पिटलजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून समोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे; दोघांना उपचारासाठी कुडचडे आरोग्य केंद्रात हलवण्यात आले असून या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.

(Accident In Curchorem)

गोव्यात अपघातांचे सत्र थांबेना; गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून एकाच दिवशी तीन - तीन व्यक्ती अपघातात दगावल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज खुरीस, बांबोळी येथे दोन भरधाव कारमध्ये धडक झाल्याची घटना घडली आहे.

कारची धडक; एका वृद्ध महिला ठार

नावेली येथे एका कारची स्कूटरला धडक बसल्याने मागच्या सीटवर बसलेली ॲना जॉकी पिरीस (79) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोघेजण जखमी झाले आहेत.

सकाळी साडेआठच्या सुमारास बेले-नावेली येथे हा अपघात घडला. एका क्रॉसिंगवर गती कमी केलेल्या त्यांच्या स्कूटरला मागून येणाऱ्या वॅगनार कारची धडक बसल्याने ती वृद्धा उसळून खाली पडली.

या अपघातात वृद्धेचे नातलग दुचाकीस्वार मानुएल पिरीस (64) हे झाले जखमी असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. या अपघातात कारमध्ये बसलेली मंजिरा हरमलकर ही महिला जखमी झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

SCROLL FOR NEXT