Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापसा नगरपालिकेत ‘त्या’ रोजंदारी चालकाविरुद्ध सेवासमाप्तीची कारवाई

कामगाराने सेवा व नगरपालिका नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीत आढळल्याने त्यास कामावरुन काढल्याची माहिती मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: सेवा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी म्हापसा नगरपालिकेच्या एका रोजंदारी कचरावाहू चालकाविरुद्ध सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी आदेश काढला. दुर्गाप्पा तलवार असे कामावरुन काढलेल्या या चालकाचे नाव आहे.

या कामगाराने सेवा व नगरपालिका नियमांचे उल्लंघन केल्याचे चौकशीत आढळल्याने त्यास कामावरुन काढल्याची माहिती मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी दिली.

उपलब्ध माहितीनुसार, 20 डिसेंबर 2022 रोजी सदर चालक हा म्हापसा पालिका कार्यक्षेत्र सोडून कोलवाळ पंचायत क्षेत्रातील एका भंगारअड्ड्यामधील कचरा बेकायदेशीरपणे उकल करत होता.

या रोजंदारी चालकाने पालिकेचा कचरावाहू टीप्पर ट्रक (जीए 03 के 2200) ए.के. इंटरप्रायझच्या आवारात उभा केला असता, म्हापसा उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, नगरसेवक विराज फडके व साईनाथ राऊळ या तिघांनी मिळून या संशयित चालकास कचरावाहू वाहनासह घटनास्थळी रात्रीच्या वेळी रंगेहाथ पकडले होते.

सेवा नियमाचे उल्लंघन

मुख्याधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा करुन नंतर चौकशी केली. यात चालकाने पालिका कायद्यानुसार सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुख्याधिकाऱ्यांनी सदर रोजंदारी चालकाविरुद्ध सेवासमाप्तीची कारवाई केली.

कारण ट्रीपमधून येणारा महसूल हा थेट चालकाच्या खिशात जात होता. तसेच बेकायदेशीरपणे हा कचरा उचल करून हा संपूर्ण कचरा नंतर म्हापसा पालिकेच्या प्रकल्पात आणून टाकायचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT