Margao 'कोमुनिदाद निवडणुकीत' तणाव..!

 

Dainik Gomantak

गोवा

मडगाव 'कोमुनिदाद निवडणुकीत' एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप..!

तीन वर्षाच्या कार्यकालासाठी व्यवस्थापकीय समिती निवडण्यासाठी रविवारी मडगाव कोमुनिदादीची निवडणूक पार पडली..

दैनिक गोमन्तक

मडगाव (Margao) : तीन वर्षाच्या कार्यकालासाठी व्यवस्थापकीय समिती निवडण्यासाठी रविवारी मडगाव कोमुनिदादीची निवडणूक (Election) झाली असता काहीसे तणावाचे वातावरण राहिले तसेच निवडणुकीत गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले. त्यातून पोलिसांनाही (Police) पाचारण केले गेले.

पोलिस (Police) बंदोबस्तात झालेल्या मतमोजणीत साव्हियो कुरैय्या, सेलस्तीन नोरोन्हा व विनस्टन कुलासो यांनी प्रतिस्पर्धी नगरसेवक तथा एसटी नेता कामिल बार्रेटो यांच्या गटावर दणदणीत विजय मिळविला.यावेळी बार्रेटो यांनी कुरैय्या हे कोमुनिदादीपासून दूर अंतरावर राहतात असा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या निवडीस आव्हान दिले पण त्याला त्यांनी कोणताच पुरावा जोडला नसल्याचे कारण सांगून निर्वाचन अधिकाऱ्यांनी हरकत फेटाळून लावली.

निवडीनंतर बोलताना कुरैय्या यांनी प्रतिस्पर्ध्यावर या निवडणुकीत राजकारण आणल्याचा तसेच शेवटच्या क्षणी मतदार यादीत 50 नावे घुसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला व त्या प्रकाराला कोमुनिदाद सदस्यांनी योग्य उत्तर दिल्याचे सांगितले.

तीन वर्षाच्या काळात बेकायदा बांधकामावर (illegal construction) कारवाई करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.

कामिल व त्यांच्या गटातील इतरांनी आपण हरलो त्याचे कारण अधिकतम सदस्य प्रतिस्पर्ध्याच्या दबावाखाली असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपण सारे खालच्या वर्गातील असलो तरी या गटाला चांगली लढत दिली, त्यांनी आपल्या अनेक सदस्यांना मतदानापासून परावृत्त करण्यासाठी दारे बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला. या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपाचा दावाही त्यांनी फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT