Velsao double railway track work controversy Dainik Gomantak
गोवा

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

Velsao double railway track work: वेळसाव येथील दुपदरी रेलमार्गाच्या कामाला विरोध करण्यासाठी सोमवारी स्थानिक रहिवासी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आल्याने तणाव निर्माण झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: वेळसाव येथील दुपदरी रेलमार्गाच्या कामाला विरोध करण्यासाठी सोमवारी स्थानिक रहिवासी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आल्याने तणाव निर्माण झाला.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘जेसीबी’ आणून स्थानिकांची पारंपरिक वाट अडविणारी खडी हटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ‘जेसीबी’समोर उभे राहून अडथळा आणला. मात्र, चालकाने ‘जेसीबी’ मागे नेत काही ठिकाणची खडी बाजूला केली.

दुपदरी रेलमार्गामुळे पारंपरिक वाट कायमस्वरूपी बंद होण्याची भीती व्यक्त करत स्थानिकांनी ‘दुपदरी रेलमार्ग आणि कोळसा नको’ अशी जोरदार मागणी केली.

माजी मंत्री एलिना साल्ढाणा यांनी कोळसा वाहतुकीसाठी दुपदरी रेलमार्गाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विरोध केला होता, असे सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि तत्कालीन मंत्री नीलेश काब्राल यांनी पाहणी करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

सरदेसाई यांनी भूसंपादन न करताच रेल्वेचे काम सुरू असल्याचा दावा केला. यावेळी पाटकर, सरदेसाई यांच्यासह स्थानिक नेते व कार्यकर्ते ‘जेसीबी’जवळ पोहोचले. पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्यासह पोलिसांनी जेसीबी रोखल्याने वाद झाला.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक गुरुदास कदम, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर व मामलेदार प्रवीणजय पंडित दाखल झाले. गावकर यांनी संबंधितांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत काम बंद ठेवावे, अशी मागणी स्थानिकांनी केली. पारंपरिक वाटेसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिन कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी; स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सन्मानावर विशेष भर

Margao Dengue Cases: मडगावात डेंग्यूचा फैलाव! दहा दिवसांत 71 रुग्ण, 27 रुग्णांवर इस्पितळात उपचार

शौचालयात गेला असता काही मिनिटांत 'होत्याचे नव्हते', भिंत अंगावर कोसळून चिमुकल्याचा मृत्यू; नाणूसमधील दुर्घटना

SCROLL FOR NEXT