Malaria Patients in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: धारगळ येथे मलेरियाचे 10 रुग्‍ण!

गोव्यातील (Goa) ओशेलबाग येथेही चार रुग्ण मलेरियाग्रस्त; परिसरात खळबळ

दैनिक गोमन्तक

पेडणे: गोव्यातील धारगळ येथील नियोजित आयुष इस्पितळ प्रकल्पात काम करणाऱ्या सुमारे दहा कामगारांना आतापर्यंत मलेरियाची (Malaria) लागण झालेली आहे, तर तेथून जवळच असलेल्या ओशेलबाग येथे चार रुग्ण सापडले आहेत. आयुष इस्पितळ प्रकल्पाच्या आत सांडपाण्यामुळे झालेली घाण तसेच ओशेलबाग परिसरात काही धाब्यांमागे होणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्‍यामुळे ही समस्या निर्माण झाली असल्याचे पंच सदस्य प्रदीप पटेकर यांनी सांगितले. (Ten malaria patients were found at Dhargal)

मलेरियाची लागण झालेल्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. त्यातील दोघांना इस्पितळातून डिस्‍चार्ज देण्‍यात आला आहे. यासंबंधी पंच पटेकर यांनी सांगतिले, की आयुष इस्पितळ प्रकल्प बांधकामासाठी सुमारे साडेतीनशे कामगार वावरत आहेत. या प्रकल्पाच्या आत काय चालले आहे त्याची पाहणी करण्यासाठी पंचायत सचिव गेले असता त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही.

प्रकल्पाच्या आत दोन-तीन ठिकाणी साचणाऱ्या सांडपाण्यामुळे तसेच या परिसरात असलेल्या धाब्यांच्या, दुकानांच्या आसपास टायर आणि डबक्‍यांमध्‍ये पाणी साचत असल्‍याने डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे.

इस्पितळ इमारतीबाहेर टाकण्‍यात आलेला ढीगभर कचरा पंचायतीला उचलावा लागला. आता आरोग्य खात्याने पुढाकार घेऊन या भागांत औषध फवारणी करावी व अस्‍वच्‍छता करत असलेल्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही पटेकर यांनी केली.

बांधकाम परिसराची पाहणी

कासारवर्णे सरकारी इस्पितळाचे आरोग्य अधिकारी डॉ. नार्वेकर म्हणाले, की इस्पितळ बांधकाम परिसर व अन्य ठिकाणी आम्ही पाहणी केली असून एक खास पथक तयार करण्‍यात आले आहे. हे पथक आवश्‍‍यक उपाययोजना करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT