Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

तंत्रज्ञानाच्‍या साहाय्‍याने रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवणार : मंत्री काब्राल

सध्‍या गोव्यातील बहुतांश रस्‍ते खड्डेमुक्त झाले असून काही काम मान्‍सूनपूर्व पावसामुळे रखडले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : मान्‍सूनपूर्व पावसामुळे राज्‍यात सुरू असलेल्‍या रस्‍तादुरुस्‍ती आणि हॉटमिक्‍सिंग डांबरीकरण कामात अडथळा येत आहे. मात्र नव्‍याने तंत्रज्ञानाच्‍या साहाय्‍याने रस्‍त्‍यांवर पडलेले खड्डे बुजविण्‍यासाठी प्राधान्‍य देत असल्‍याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

मंत्रिमंडळाच्‍या बैठकीनंतर काब्राल पत्रकारांशी बोलत होते. ते म्‍हणाले की, राज्‍यातील महत्त्‍वाचे रस्‍ते हॉटमिक्‍सिंग होऊन पूर्ण झालेले आहेत. मात्र गावातील रस्‍ते आणि छोट्या गावांना जोडणाऱ्या अरुंद रस्‍त्‍यांमुळे हॉटमिक्‍सिंग करणारी यंत्रणा पोचू शकत नसल्‍याने त्‍या रस्‍त्‍यांचे डांबरीकरण झालेले नाही. मात्र तेही पूर्ण करण्‍यावर आपला भर आहे.

सध्‍या गोव्यातील बहुतांश रस्‍ते खड्डेमुक्त झाले असून काही काम मान्‍सूनपूर्व पावसामुळे रखडले आहे. मात्र नव्‍या तंत्रज्ञानाच्‍या साहाय्‍याने हे काम पूर्ण करण्‍याचा आमचा प्रयत्‍न आहे. यासाठी उच्चदाबच्‍या साहाय्‍याने पाणी काढून अर्ध्या तासात रस्‍ता डांबरीकरण करण्‍यासाठीचे प्रयत्‍न सुरू आहेत. ‘अटलसेतू’ प्रकल्‍प हा गोवा राज्‍य साधनसुविधा महामंडळाचा प्रकल्‍प असून, तो सार्वजनिक बांधकाम खात्‍याकडे वर्ग करण्‍यात आलेला नाही. जर या प्रकल्‍पात काही त्रुटी आढळल्‍यास आम्‍ही तो प्रकल्‍प सार्वजनिक बांधकाम खात्‍यात घेणार नाही. सध्‍या अटलसेतूचा प्रकल्‍प पूर्णत्‍वानंतरचा देखभाल काळ सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT