Curlies Club | Sonali Phogat Case  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : ‘सीबीआय’कडून ‘कर्लिस’ची झडती

नुनीसचीही कसून चौकशी; सोनाली हत्या प्रकरणात आणखी काहींना अटक शक्‍य

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी सीबीआय पथकाने काल रविवारी फॉरेन्सिक तज्ज्ञ अधिकाऱ्यांसह हणजूण येथील कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटला भेट दिली. तेथे सोनाली बेशुद्धावस्थेत होत्या, त्या जागेची कसून पाहणी केली. ‘कर्लिसॅचा चालक एडविन नुनीस व काही कर्मचाऱ्यांची चौकशी करत जबानी नोंदवल्या. यानंतर पथकाने पुन्हा द ग्रँड लिओनी रिसॉर्टवर जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासप्रक्रिया सुरू केली.

सीबीआयने शनिवारी दिवसभर ‘लिओनी’ रिसॉर्टमध्ये सोनाली तसेच सांगवान व सुखविंदर सिंग वास्तव्यास असलेल्या 3 खोल्यांची बारकाईने तपासत सील केल्या. त्यानंतर काल रविवारी सकाळी पथकाने ‘कर्लिस’कडे मोर्चा वळविला. दोन तास या शॅकच्या शौचालयात ज्या ठिकाणी सोनाली या बेशुद्धावस्थेत पडून होत्या त्या जागेची पाहणी केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली.

संशयितांना पोलिस कोठडीची शक्यता

सोनाली यांच्यासोबत गोव्यात आलेला त्यांचा पीए सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सीबीआयने नव्याने तपास सुरू केल्याने त्यांच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीसाठी हे पथक न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांसमोर आव्हान

गेल्या दोन दिवसांमध्ये सीबीआयने गोवा पोलिसांनी ज्या तपासकामात त्रुटी ठेवलेल्या आहेत, त्याची माहिती जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनालींच्या मृत्यूमागील कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याचा तपास हे पथक करत असल्याचे सूत्राने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT