Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa शिक्षक समुदायाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान!

पुरस्कारप्राप्‍त शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव..

दैनिक गोमन्तक

राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त विजेत्या शिक्षकांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले. हे पुरस्कार गुणवत्तेवर दिले जातात, अनुकूलतेवर नाहीत, असे ते म्हणाले. कोविड काळात ऑनलाईन वर्ग आयोजित करून शिक्षक समुदायाने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

राज्य शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये सरोजिनी नारायण गावस, सरकारी प्राथमिक शाळा ठाणे-सत्तरी. गणपतराव कुस्तोबाराव राणे सरकारी हायस्कूल, आंबेडे-नगरगाव. डायगो एस. पिंटो सेंट फ्रान्सिस झेवियर हायस्कूल, शिवोली. देविदास विठोबा कोटकर सरकारी हायस्कूल, आंबेडे-नगरगाव. सुभाष बाळकृष्ण जाण श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालय, कुर्टी-फोंडा आणि मारियो क्रिस्‍तोफर रुबेन कोस्‍ता उच्च माध्यमिक विद्यालय, राय यांचा समावेश आहे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री: बदलीसाठी राजकीय नेत्यांकडे जाता, हे ठीक आहे. मात्र, पुरस्कारांसाठी राजकीय नेत्यांकडे जाऊ नका. ते गुणवत्तेच्या आधारेच दिले जाणार. काही शिक्षक पुरस्‍कारांसाठी राजकीय नेत्यांकडे लॉबिंग करतात व हे वाईट आहे. गुणवत्ता पुरस्कारही राजकीय शिफारशीनुसार दिले गेले तर त्याला कसलाच अर्थ नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

March 2026: 'मार्च' संपत का नाहीये? युद्ध, वर्ल्ड कप, ‘धुरंधर 2’ची क्रेझ, एलपीजी टंचाई; पहा या महिन्यात नेमके काय काय घडले?

Chimbel: ‘बजेट’ शिपायाने बनवले काय? चिंबल ग्रामसभेत सरपंचांना संतप्त सवाल; पंचायत मंडळावर ग्रामस्थांची जोरदार टीका

Goa Politics: खरी कुजबुज; परप्रांतीयांची मते कुणाकडे?

Virat Kohli: '..तर मी स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतणार नाही'! कोहलीच्या विधानाने चाहत्यांना धक्का; तुफानी फटकेबाजीबद्दल म्हणाला की..

CM Pramod Sawant: ‘कशे आसात दोतोर?’ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साखळीत गर्दी; आरोग्याची केली विचारपूस

SCROLL FOR NEXT