TCP Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Pernem Zoning Plan: जमीन रूपांतर आराखडा रद्द होणार नाही; नगरनियोजन मंत्री ठाम

सूचना, हरकती मांडण्यास वाव; पंचायतींना विश्वासात घेणार

दैनिक गोमन्तक

TCP Minister Vishwajit Rane On Pernem Zoning Plan: विकासापासून दूर असलेल्या पेडणे तालुक्याचा जमीन रूपांतर आराखडा (झोनिंग प्लॅन) २० वर्षांनंतर खुला करण्यात आला आहे. त्याचा मसुदा प्रत्येक पंचायतींना पाठवण्यात आला असून यावर नागरिकांनी सूचना, हरकती मांडाव्यात.

सर्वांना विश्वासात घेऊनच तो अधिसूचित करण्यात येईल. मात्र, तो कोणत्याही स्थितीत माघारी अथवा रद्द केला जाणार नाही, असे ठाम मत नगरनियोजन आणि शहरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये मांडले.

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचे कारनामे त्यांनी या पत्रकार परिषदेत उघड केले.

मंत्री राणे म्हणाले की, स्थानिक आमदार जीत आरोलकर व्यक्तिगत स्वार्थासाठी या जमीन रूपांतर आराखड्याला विरोध करत आहेत. त्यांनी यापूर्वी स्वतःच्या अनेक जागा रूपांतरित करून घेतल्या असून त्या शेजारील जागा रूपांतरित करण्यासाठी त्यांचा विरोध होता.

तो केवळ त्या जमिनी हडप करण्यासाठीच होता, हे स्पष्ट झाले आहे. अशा लोकप्रतिनिधींकडून सरकारच्या विकासकामांना विरोध होतोय, हे खपवून घेतले जाणार नाही.

आमदार आरोलकर आमच्या सरकारला पाठिंबा दिलेल्या पक्षाचे आमदार आहेत. पण व्यक्तिगत स्वार्थासाठी त्यांचा सरकारच्या विकास योजनांना विरोध आहे. गेल्या २० वर्षांपासून पेडणे तालुक्याचा आराखडा रखडलेला होता.

आम्ही तो पुन्हा खुला केला आहे. या मसुद्याच्या प्रती प्रत्येक पंचायतींना पाठवल्या आहेत. अनेक गावांचे सरपंच आणि सदस्य आम्हाला येऊन भेटत असून मसुद्याचे स्वागत करत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी या आराखड्याचे समर्थन केले आहे.

मसुदा असल्याने प्रत्येक पंचायतीकडून सूचना, हरकती विचारात घेतल्या जातील आणि मगच तो अधिसूचित करण्यात येईल. मात्र, तो कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात येणार नाही, असेही राणे म्हणाले.

आरोलकर यांनी केली अनेक रूपांतरे

यावेळी मंत्री राणे म्हणाले की, आमदार आरोलकर हे जमीन विकासक आहेत. त्यांनी आपल्या अनेक जमिनी रूपांतरित करून घेतल्या आहेत.

याबाबतचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे. योग्यवेळी तेही उघड करू. त्यांनी धारगळ, तोरसे, विर्नोडा येथील अनेक जमीन रूपांतरित करून घेतल्या असून बेकायदा फार्म हाऊसची उभारणी केली आहे. याबाबत कारवाई केली जाईल.

"अनेक आमदार जमीन रूपांतर करतात. जीत आरोलकरही स्वतःच्या १ लाख चौरस मीटर जमिनीच्या रूपांतरासाठी माझ्या घरी आले होते. तो प्रस्ताव मी नाकारला."

"त्यांनी अनेक बेकायदा कामे केली आहेत. अशा अनेक आमदारांना व्हिडिओद्वारे विधानसभेत उघडे पाडण्याची परवानगी मागणार आहे. २०० मतांनी जिंकून आलेल्यांनी मला शिकवू नये."

- विश्वजीत राणे, नगरनियोजन मंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT