Vedanta: वेदांता कर्जाच्या ओझ्याखाली; लोहखनिज व्यवसाय विकण्याचे संकेत

अध्यक्षांचा दुजोरा
Vedanta Sesa
Vedanta Sesa Gomantak Digital Team
Published on
Updated on

Vedanta Resources Under The Burden Of Debt: पोलाद आणि लोहखनिजाचा व्यवसाय वेदान्ता कंपनी विकू शकते. कंपनीचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याची पुष्टी केली आहे.

कर्ज कमी करण्यासाठी कंपनी पोलाद आणि लोहखनिजाच्या व्यवसायाची विक्री करू शकते, याला त्यांनी मुलाखतीत दुजोरा दिला आहे. गोव्यासाठी ही महत्त्वाची घडामोड आहे.

कारण वेदान्ताचा लोहखनिज व्यवसाय गोवाकेंद्रीत आहे. खाणी, खनिज प्रक्रिया प्रकल्प, धक्के, बार्ज, आमोण्याचा पिग आयर्न प्रकल्प, ट्रक तसेच कर्मचारीही गोव्यातच आहेत.

सध्या जागतिक पातळीवर व्याजदर वाढवले जात आहेत. भाववाढ रोखण्यासाठी असे केले जात आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बॅंकेने तर व्याज दर दीर्घ कालावधीसाठी चढेच राहतील, असा इशाराही दिला आहे.

कर्जावर द्यावे लागणारे व्याज हे व्यवसायातील नफ्याचा वाटा खाते. त्यामुळे व्यवसाय टिकवण्यासाठी कर्जाचा भार कमी कऱणे, हाच पर्याय व्यावसायिकांसमोर राहतो.

या मुलाखतीत अगरवाल यांनी पुढील वर्षी कर्जफेडीसाठी अदा करावे लागणारे २ अब्ज अमेरिकी डॉलर देण्यास सक्षम आहोत, असे नमूद केले आहे.

Vedanta Sesa
37th National Games 2023 Goa: गोव्याला एकूण किती पदके मिळतील सांगणे कठीण : क्रीडामंत्री गावडे

कच्चे तेल, तांबे, ॲल्युमिनियम आणि जस्ताचा व्यवसाय उत्तमरित्या सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

याआधी वेदांता कंपनी आपले व्यवसाय विकेल, अशी चर्चा सुरू होती. यानंतर शेअर बाजाराला कंपनीने आपण विभाजित होत असल्याची माहिती दिली होती.

राज्याच्या विधानसभा अधिवेशनातही वेदांता लोहखनिज व्यवसाय विकून टाकेल, अशी भीती व्यक्त केली होती.

सरकारला या कंपनीकडून खाण घोटाळा प्रकरणातील काही मोठी रक्कम येणे असल्याने लोहखनिज व्यवसायच दुसऱ्या कंपनीला विकून या जबाबदारीतून मुक्त होण्याची पळवाट शोधली जाऊ शकते, याकडे सरकारचे विधानसभेत लक्ष वेधण्यात आले होते.

खाणपट्टेही संकटाच्या घेऱ्यात

असे असले तरी काही व्यवसाय विकावे लागतील आणि त्यात लोहखनिज उद्योगाचा समावेश असेल, असे सांगण्यात येत आहे. डिचोली येथील खाणपट्टा लिलावात जिंकल्यानंतर पर्यावरण दाखला मिळवणे वेदान्ताला शक्य झालेले नाही.

केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाने अनेक बाबींवर खुलासा मागितला आहे. पर्यावरण आघात मूल्यांकन अहवालातील त्रुटींवर त्यामुळे चर्चा होणे अपेक्षित आहे. जनसुनावणीनंतर मंत्रालयाकडून दाखला मिळतो; पण याबाबतीत तसे झालेले नाही.

कामगारांचे भवितव्य संकटात

अर्थतज्ज्ञ राजेंद्र काकोडकर यांनी म्हटले आहे, की गोव्यातील खाणींची विक्री खुल्या लिलावातून नव्हे, तर खासगी देवघेवीतून लंडन, मुंबईत होते. त्यामुळे गोमंतकीय खाण कामगारांचे भवितव्य फारसे उज्‍ज्वल नाही.

कारण पोलाद व्यवसायातील बादशहा असलेले आर्सेलर मित्तल किंवा टाटा कोरस ही मालमत्ता घेण्याच्या स्थितीत असतील. जिंदाल यांना पेण व हॉस्पेट येथे लोहखनिज लागत असल्याने तेही खरेदीदार असू शकतात. कारण ही दोन्ही ठिकाणे गोव्याशी लोहमार्गाने जोडलेली आहेत.

अनेकांनी व्यवसायात दाखवला रस

असे असले तरी वेदान्ताच्या लोहखनिज व्यवसायात अनेक कंपन्यांनी रस दाखवला आहे. ‘होय, लोहखनिज व्यवसायात अनेकांनी रस दाखवला आहे’, असे अगरवाल यांनी मुलाखतीत नमूद केले आहे.

याविषयी वेदान्ताची बाजू मिळवण्याचा प्रयत्न केला असता आताच्या घडीला काही प्रतिक्रिया देता येत नाही, असे सांगण्यात आले.

Vedanta Sesa
Oh My God: खाणीविरोधात शिरगावची देवी लईराई चक्क कोर्टात; खंडपीठाची नोटीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com