Taxis in Goa  Dainik Gomantak
गोवा

‘पर्यटकच सांगतात टॅक्‍सींना डिजिटल मीटर नकोत’

दैनिक गोमन्तक

म्हापसा : मोपा विमानतळामुळे उद्योग व अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. भविष्यात पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने याचा फायदा केवळ उत्तर गोव्यालाच नाही तर संपूर्ण गोव्याला होईल. मात्र, मोपा विमानतळावर टॅक्सी व्यवसाय असो किंवा इतर व्यवसाय, पहिले प्राधान्य हे पेडणेकरांनाच मिळाले पाहिजे, अशी मागणी या भागांतील लोकांची आहे. पर्यटक टॅक्सीत बसल्यानंतर मीटरने भाडे नको, असे सरळ सांगतात. हेच पर्यटक आम्हाला एक ठराविक आकडा विचारतात व त्यानुसार भाडे मारण्यास सांगतात, असे बहुतांश टॅक्सीवाल्यांनी सांगितले.

त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार, टॅक्सींना आम्ही डिजिटल मीटर बसविले, परंतु पर्यटक मीटरला नकार देतात. त्यांना कमी पैशांत भटकंती करायची असते आणि प्रत्येक चारचाकीच्या आकारानुसार किलोमीटरचे दर ठरले आहेत. छोट्या वाहनांचे दर हे किलोमीटरमागे 43 रुपये तर काही मोठ्या वाहनांचे दर 47 रुपये इतके आहेत. हे दर रात्रीच्या वेळी बदलतात. त्यामुळे पर्यटक ठराविक रक्कम निश्चित करूनच भाडी मारण्यास सांगतात.

सरकारने पेडण्यातील स्थानिकांना परस्पर डावलून जर, इतरांना याठिकाणी व्यवसायाची अनुमती दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा सज्जड इशारा मोरजी टॅक्सीमालक संघटनेचे अध्यक्ष संजय कोले यांनी दिला आहे. मोपा विमानतळावर दक्षिण गोव्यातील टॅक्सीचालकांना भाडी मारण्यास आम्ही परवानगी देणार नाही, असेही त्‍यांनी सांगितले. याविषयी, कारण विचारल्यास ते म्‍हणाले की, दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ असूनही आम्हाला तिथे भाडे मारण्यापासून वंचित ठेवले जाते. जर गेस्ट लोकांचे हॉटेल बुकिंग असल्यास आम्ही तिथे जातो किंवा पर्यटकांना सोडण्यासाठीच जातो. मात्र, तेथून भाडे घेऊ शकत नाही. इतकी वर्षे आम्हाला हा नियम लागू होता तर मोपा विमानतळासाठी दुसरा नियम का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सध्या सरकारने सर्व टॅक्सीवाल्यांना डिजिटल मीटर सक्तीचे केले आहेत. परंतु याचा काहीच उपयोग होत नसल्याचे या टॅक्सीचालकांचे स्पष्ट मत आहे. मुळात सरकारने ही सुविधा राबविण्यापूर्वी त्याची चाचणी घ्यायला हवी होती. टॅक्सीवाले लुटतात, हा आरोप खोटा असल्‍याचे ते म्‍हणतात.

टॅक्सीचालकांकडून आरोपांचे खंडन

टॅक्सीचालक हे मीटरची अंमलबजावणी करीत नाहीत, हे आरोप चुकीचे आहेत. उलट पर्यटक मीटरचे दर परवडत नाहीत असे सांगत तेच एखादी निश्चित रक्कम ठरवून वाटाघाटी करतात. सरकारने ही प्रणाली राबविण्यापूर्वी त्याची चाचणी करायला हवी होती.

आता अनेकांनी टॅक्सींना डिजिटल मीटर बसविले. मात्र त्याचा वापरच होत नाही. कारण पर्यटकांनाच ते नको आहेत. सरकारने स्वतःच्या कमिशनसाठी हे मीटर बसविले. हे मीटर दोषपूर्ण असून काही मीटर जळण्याचे प्रकारही घडले आहेत, असा टॅक्सीचालकांचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT