Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकांची काउंटरची मागणी अमान्य; राज्य सरकारची भूमिका

दाबोळी विमानतळावर टॅक्सी काउंटर मिळावा यासाठी वास्को टुरिस्ट टॅक्सी युनियनने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्य सरकारने आज उच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, दाबोळी विमानतळावर टॅक्सी चालकांची काउंटरची मागणी मान्य नाही. त्याऐवजी ते फोनवर उपलब्ध असावेत, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे महाधिवक्ता देवीदास पांगम यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

(Taxi operators demand for more counters at Dabolim not justified Government to High Court in goa)

दाबोळी विमानतळावर टॅक्सी काउंटर मिळावा यासाठी वास्को टुरिस्ट टॅक्सी युनियनने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या परवानगीच्या अटीनुसार त्यांची मागणी वैध नाही, असे सरकारने न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

वाहतुकमंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, जर टॅक्सी व्यवसायिकांना गोवा माईल्समध्ये जायचे असेल तर त्यांचे स्वागत केले जाईल. तसेच पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी दाबोळी विमानतळावरील सर्व टॅक्सी व्यवसायिकांनी प्रामाणिकपणे कार्य करावे. पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी राज्य सरकार विविध प्रकारे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही- मंत्री गुदिन्हो

राज्याला दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ महत्त्वाचे आहेत. मात्र, सध्या दाबोळीवर टॅक्सी व्यावसायिकांची सुरू असलेली मनमानी येत्या काळात त्रासदायक ठरणार आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आमची जबाबदारी असून यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असे गुदिन्हो म्हणाले.

या दौऱ्यात मंत्री गुदिन्हो यांच्यासमवेत वाहतुक संचालक राजन सातार्डेकर, कदंब वाहतुक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ए. नेटो, सरव्यवस्थापक राजन घाटे, दाबोळी विमानतळ संचालक अनंत राव, मुरगाव तालुका सहाय्यक वाहतुक संचालक राजेश नाईक, दाबोळी विमानतळ वाहतुक पोलिस निरीक्षक राहुल धामस्कर, युनायटेड टॅक्सीमॅन युनियनचे अध्यक्ष विद्याधर दिवकर, प्रसाद प्रभूगावकर, संजय नाईक  उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT