Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: समन्वय समितीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध! सल्लामसलत न केल्याबद्दल टॅक्सी चालक झाले नाराज

Goa Taxi Operators: राज्यातील टॅक्सीचालकांनी आमदार मायकल लोबो आणि आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर केलेल्या समन्वय समितीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taxi Drivers Issue

पणजी: राज्यातील टॅक्सीचालकांनी आमदार मायकल लोबो आणि आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर केलेल्या समन्वय समितीच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावाच्या आधी त्यांच्याशी सल्लामसलत न केल्याबद्दल टॅक्सी चालकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, बैठकीत उपस्थित सुदीप ताम्हणकर यांनी आपण आपला प्रस्ताव मागे घेण्याचे मान्य केले.

टॅक्सी चालकांनी बैठकीत सांगितले की, आमच्या भवितव्यावर परिणाम करणारे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणे अत्यावश्यक आहे. सोबतच लोबो यांनी टॅक्सी चालकांच्या मतांकडे दुर्लक्ष्य केल्याचा आरोपदेखील चालकांनी केला.

याबाबत आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले की, जर टॅक्सी चालकांचा पाठिंबा नसेल तर हा प्रस्ताव मागे घेतला जाईल. मात्र, या आश्वासनाने चालकांची नाराजी कमी झाली नाही. त्यांनी या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता असण्याची मागणी देखील केली.

गोव्यातील खासगी टॅक्सी ऑपरेटर आणि ॲप आधारित टॅक्सी अॅग्रीगेटर्समधील वाद मिटविण्यासाठी समन्वय समिती स्थापनेची मागणी मायकल लोबो आणि खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी मुख्यमंत्र्यांना बुधवारी निवेदन सादर करून केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Goa Live News: वाळपई बसस्थानकाच्या सार्वजनिक शौचालयाची परिस्थिती पहा...

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

King Kohli journey,: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

SCROLL FOR NEXT