Taxi drivers besiege transport directorate in Panaji against Goa Miles
Taxi drivers besiege transport directorate in Panaji against Goa Miles 
गोवा

'गोवा माईल्स' विरूद्ध गोव्यातील टॅक्सीचालकांचा वाहतूक संचालनालयाला घेराव

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : गोव्यात सुरू असलेल्या गोवा माईल्स या टॅक्सी अ‍ॅपला विरोध करण्यासाठी इतर टॅक्सी मालकांनी आज वाहतूक संचालकांना भेटण्याचा प्रयत्न केला. जुंता हाऊस या इमारतीतील वाहतूक संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर टॅक्सी मालकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र वाहतूक संचालक यांनी केवळ पाच जणांच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची तयारी दाखवली. यामुळे वैतागून टॅक्सी मालक पर्वरी येथील सचिवालयात वाहतूक सचिवांना भेटण्यास निघून गेले.

पर्वरी येथील सचिवालयात या टॅक्सी मालकांना प्रवेश देण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे. यामुळे पर्वरी येथे आता काहीसे तणावाचे वातावरण आहे. वाहतूक सचिवांनी भेटण्यास परवानगी दिल्याशिवाय आपण  टॅक्सी मालकांना सचिवालयात जाण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या सचिवालयाच्या बाहेर टॅक्सी मालकांचा मोठा जमाव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Laxmikant Parsekar: नाराज लक्ष्मीकांत पार्सेकरांचा अखेर पंतप्रधान मोदींना पाठिंबा, भाजपला फायदा होणार?

Goa Politics: दोन दिवसांवर मतदान! SC, ST नेत्यांचा इंडिया आघाडीला पाठिंबा, भाजपने विश्वासघात केल्याचा आरोप

Goa BJP: सावर्डेचे माजी आमदार दीपक पाऊस्कर यांचा भाऊ संदीप यांच्यासह भाजपात प्रवेश

Goa News : लोकसभा निवडणूक कामगिरीवरून विधानसभेची उमेदवारी गृहीत धरू नये : सदानंद शेट तानावडे

Indian Navy: भारतीय नौदलाला मिळणार हायटेक पाणबुडी, जास्त वेळ पाण्याखाली राहू शकणार; जाणून घ्या काय आहे खास

SCROLL FOR NEXT