Submarine
SubmarineDainik Gomantak

Indian Navy: भारतीय नौदलाला मिळणार हायटेक पाणबुडी, जास्त वेळ पाण्याखाली राहू शकणार; जाणून घ्या काय आहे खास

Indian Navy: भारतीय लष्कराला हायटेक शस्त्रास्त्रांनी अपग्रेड केले जात आहे. देशाच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे.

Indian Navy: भारतीय लष्कराला हायटेक शस्त्रास्त्रांनी अपग्रेड केले जात आहे. देशाच्या सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे. यामुळेच लष्करी दृष्टिकोनातून भारताची स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत आहे. या दिशेने भारतीय नौदल आता आपल्या पारंपारिक पाणबुडीच्या ताफ्याला हायटेक बनवण्यासाठी पावले उचलत आहे. भारतीय नौदलाने हायटेक पाणबुडी तयार करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. एवढेच नाही तर पाणबुडी बनवण्यासाठी टेस्टिंगही सुरु करण्यात आले आहे.

6 पाणबुड्यांची निर्मिती

भारतीय नौदलाने लार्सन अँड टुब्रो आणि माझॅगॉन डॉकयार्ड लिमिटेडसह कॉम्पटीटिव टीमचे टेस्टिंग सुरु केले आहे. एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञानाने सुसज्ज सहा स्टेल्थ पाणबुड्या 60,000 कोटी रुपयांच्या करारांतर्गत तयार केल्या जातील. या हायटेक पाणबुड्यांची ही खासियत आहे की, त्या जास्त वेळ पाण्याखाली राहू शकतात. हायटेक रडार प्रणालीमुळे समुद्रात होणाऱ्या शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवता येते.

Submarine
Indian Navy Operation: भारतीय नौदलाची कौतुकास्पद कामगिरी! अपहरण केलेल्या जहाजाची केली सुटका

जर्मनी आणि स्पेनच्या सहकार्याने पाणबुडी तयार केली जाणार

भारतीय नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर्मनी आणि स्पेनच्या सहकार्याने भारतात स्टेल्थ पाणबुड्या तयार केल्या जातील. जर्मन पाणबुडीच्या एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन सिस्टिमची टेस्टिंग मार्चच्या शेवटच्या आठवड्यात जर्मनीतील कील येथे करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यक्रमांतर्गत जर्मनीसोबत करार करण्यात आला.

Submarine
Indian Navy War Ship: कोचीनमध्ये तयार होतेय महाविनाशक युद्धनौका, क्षणार्धात शत्रूचा नाश करेल!

मेक इन इंडिया अंतर्गत पाणबुड्या तयार केल्या जातील

दरम्यान, या प्रोजेक्टची खास गोष्ट म्हणजे भारत मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत या पाणबुड्या तयार करणार आहे. पाणबुडीच्या पुढील चाचण्या स्पॅनिश नौदल सुविधेसह जूनमध्ये होतील. या मेगा प्रोजेक्टसाठी स्पॅनिश नवांतिया आणि भारताच्या लार्सन अँड टुब्रो यांच्यात भागीदारी आहे. संरक्षण प्रकल्पांमुळे भारतीय कंपन्यांना 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिझनेस मिळू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com