Mapusa Police Station | Taxi Driver  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : म्हापसा पोलीस स्थानकात तणाव! उपनिरीक्षकाने जबरदस्ती जीपमध्ये डांबल्याचा आरोप; टॅक्सीचालकांच्या 'आम्हाला न्याय हवा'च्या घोषणा

Mapusa Police Station: पेडे-म्हापसा येथे अपघातस्थळी एका पोलिस उपनिरीक्षकाने टॅक्सीचालकाची गळपट्टी (कॉलर) पकडून त्याला जबरदस्तीने पोलिस जीपमध्ये डांबले, असा आरोप करीत मोपा तसेच इतर ठिकाणच्या टॅक्सीचालकांनी रात्री उशिरा म्हापसा पोलिस स्थानकावर मोठी गर्दी केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Taxi driver manhandled by PI near Peddem Mapusa Protests Erupt

म्हापसा: पेडे-म्हापसा येथे अपघातस्थळी एका पोलिस उपनिरीक्षकाने टॅक्सीचालकाची गळपट्टी (कॉलर) पकडून त्याला जबरदस्तीने पोलिस जीपमध्ये डांबले, असा आरोप करीत मोपा तसेच इतर ठिकाणच्या टॅक्सीचालकांनी मंगळवारी रात्री उशिरा म्हापसा पोलिस स्थानकावर मोठी गर्दी केली. संबंधित उपनिरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे पोलिस स्थानक परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रश्‍नी चेतन कामत म्हणाले, अलीकडे पोलिसांकडून टॅक्सीचालकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले आहेत; परंतु आम्ही पोलिसांची दादागिरी खपवून घेणार नाही. सरकार आणि गृह खाते अशा काही मुजोर पोलिसांना पाठीशी घालत आहे. पोलिसांनी हे प्रकरण अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.

माफीची मागणी धुडकावली

यावेळी जमावाने संबंधित पोलिस उपनिरीक्षकाने टॅक्सीचालकाची माफी मागावी, असा पवित्रा घेतला. मात्र, पोलिसांनी तसे जमणार नाही, असे स्पष्ट सांगितले. तुम्हाला हवे असल्यास लेखी तक्रार द्या, तक्रारीची योग्य दखल घेऊ, असे पोलिसांनी सुनावले. त्यानुसार टॅक्सीचालकांनी लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली.

गणवेश ठरला कळीचा मुद्दा

टॅक्सीचालकांच्या दाव्यानुसार, घटनेवेळी पोलिस उपनिरीक्षकाने युनिफॉर्म परिधान केला नव्हता. तसेच त्याची मद्यपान चाचणी करावी, अशी मागणी करत त्यांनी ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा दिल्या. यावेळी अल्कोमीटरने उपनिरीक्षकाची तपासणी केली असता, त्याची चाचणी निगेटिव्ह आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POP Ganesh Idols Restrictions: यंदाही 'पीओपी'च्‍या गणेशमूर्ती रोखणे अशक्‍य; आदेशातच अनेक पळवाटांमुळे अंमलबजावणी अशक्य

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

SCROLL FOR NEXT