Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: स्वच्छतागृहासाठी जास्‍त पैसे घेतले तर तक्रार करा; पर्यटनमंत्र्यांचे आवाहन

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: वागातोर येथील स्वच्छतागृहाच्या बाहेर दरपत्रक लावले जाईल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: वागातोर येथील स्वच्छतागृहाच्या बाहेर दरपत्रक लावले जाईल. स्वच्छतागृहात कोणी जास्त पैसे आकारत असतील तर त्याबाबतची तक्रार १३६४ या क्रमांकावर करावी, असे आवाहन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आज विधानसभेत केले. वागातोर येथे असलेली सर्व स्वच्छतागृहे कार्यान्वित केली जातील. तसेच सुलभ शौचालयाचे काम एक महिन्यात सुरू करण्‍यात येईल, असे आश्‍‍वासनही त्यांनी दिले.

शिवोलीच्‍या आमदार दिलायला लोबो यांनी प्रश्नोत्तराच्‍या तासाला हा विषय उपस्थित केला होता. खंवटे म्हणाले की, वागातोर किनाऱ्यालगत एक स्वच्छतागृह आहे. ५०० मीटरवर दुसरे आहे आणि भाडेपट्टीने दिलेल्या जमिनीमध्ये तिसरे आहे. २०१३ मध्ये सरकारने तेथील काही जमीन भाडेपट्टीवर दिली आहे. ती जमीन भाडेपट्टीवर घेणाऱ्याने स्वच्छतागृहाची देखभाल व दुरुस्ती करावी असा करार आहे. ती व्यक्तीच आता सापडत नसल्याने भाडेकरार कसा काय करावा, असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे.

वागातोर येथील स्वच्छतागृह तूर्त पर्यटन खाते दुरुस्त करेल. त्या ठिकाणी असलेली अन्य दोन स्वच्छतागृहेही कार्यान्वित केली जातील. मात्र त्यासाठी पाहणी करून खरोखरच पर्यटकांना त्यांची गरज आहे का, याचा आढावा घेतला जाणार आहे. दुरुस्तीचे काम महिनाभरात सुरू होईल.
रोहन खंवटे, पर्यटनमंत्री
सुलभ शौचालयाच्या ठिकाणी बसवलेल्या एका मुलाने दहा रुपये, वीस रुपये, तीस रुपये असा दर सांगितला. प्रत्यक्षात तेवढे पैसे स्वच्छतागृहाच्या वापरासाठी आकारले जात नाहीत. याकडे कोणी लक्ष देणार आहे का? दरपत्रक स्पष्टपणे दिसेल असे लावले गेले पाहिजे.
दिलायला लोबो, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Goa Raj Bhavan Name Change: गोव्यात ऐतिहासिक निर्णय! 'राजभवन' आता ओळखले जाणार 'लोकभवन' नावाने; राज्यपालांनी पुसली वसाहतवादी ओळख

SCROLL FOR NEXT