Tara Kerkar, Viriato Fernandes, Sadanand Tanavade  Canva
गोवा

Program Monitoring Committee: कार्यक्रम, योजना देखरेख समितीवर तारा केरकर; विरियातो अध्यक्ष तर तानावडे सहअध्यक्ष

Goa News: केंद्रीय निधीतून राबवण्यात येणारे कार्यक्रम व योजना यांच्यावर देखरेख व समन्वयासाठी खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून तारा केरकर यांची नियुक्ती केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केंद्रीय निधीतून राबवण्यात येणारे कार्यक्रम व योजना यांच्यावर देखरेख व समन्वयासाठी खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. खासदार सदानंद शेट तानावडे हे समितीचे सहअध्यक्ष आहेत. या समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून तारा केरकर यांची नियुक्ती केली आहे.

दक्षिण गोव्यातील सर्व आमदार, दक्षिणेतील सर्व पालिकांचे अध्यक्ष, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध खात्यांचे संचालक मिळून १२ शासकीय सदस्य या समितीवर आहेत.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असून या समितीवर बेतुलचे सरपंच प्रीतम कार्दोज, रायचे सरपंच पीटर क्वाद्रोज, नुवेच्या सरपंच फ्रिडा डिसा, वेळसावच्या सरपंच मारिया डायना गोवेया, बिगर सरकारी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून उतोर्डा येथील गोयचो एकवटचे विवेकानंद कंटक, अनुसूचित जातींचे प्रतिनिधी म्हणून अवेडे येथील यतीश परवार, आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून खोतीगावचे उमेश गावकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिमाही पद्धतीने या समितीची बैठक होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasai: गोवा काबीज करून, 'अल्बुर्क' भारतातील जमीन जिंकणारा दुसरा युरोपियन बनला; पोर्तुगीज वसई प्रांतात व्यापार करू लागले

Mumbai Goa Highway Bus Fire: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना, मालवणला जाणारी बस जळून खाक; चाकरमानी थोडक्यात बचावले

Indian Tribes: 'आफ्रिकेतून बाहेर पडलेले मानव भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याने गेले असतील'; वेतुवन, इरुला आणि कुरुंबार

Calangute Fire Incident: कळंगुटमध्ये मध्यरात्री अग्नितांडव, मच्छिमारांच्या दोन झोपड्या जळून खाक; 25 लाखांचे नुकसान

Goa Festival: ‘गोंयकारांनो’ उठा! नृत्य-संगीताच्या आवाजात महत्वाचे प्रश्न विसरू नका; सणांत घुसलेले राजकारण

SCROLL FOR NEXT