Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Minister Subhash Phaldesai: दस्तावेजांची छेडछाड,चोरी होऊ देणार नाही, पुराभिलेखच्या नवीन कार्यालयाचे उद्‍घाटन

Minister Subhash Phaldesai सुभाष फळदेसाई: पुराभिलेखच्या नवीन कार्यालयाचे उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक

Minister Subhash Phaldesai: पुराभिलेख खात्यातील दस्तावेजांची छेडछाड आणि चोरी व्हायला देणार नाही. एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण खात्याची बदनामी होते. त्यासाठी आत्तापासून खाते जागृत राहणार आहे. आम्ही दस्तावेजांचे जतन पुढील 500 वर्षांसाठी करण्याचे धोरण तयार करत आहे, असे पुरातत्त्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केले.

पुराभिलेख खात्याच्या नवीन कार्यालयाच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक रोहित कदम व मान्यवर उपस्थित होते.

पुरातत्त्व आणि पुराभिलेख खाते मळा-पणजी येथे होते, परंतु मळा सखल भाग असल्याने तेथे पावसाळ्यात पाणी भरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पुरातत्त्व खाते आल्तिनो येथे स्थलांतर केले आहे, तर पुराभिलेख खाते आता कदंब पठारावरील अल्कॉन इमारतीत स्थलांतर केले आहे.

तेथे 300 ते 500 वर्षांचे दस्तावेज असून स्थलांतर करताना योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. घरून लवकर येऊन व उशिरा जाऊन त्यांनी स्थलांतराचे काम पूर्ण केले आहे.

पुराभिलेख खात्याचे दस्तावेज डिजिटल केले जातील व त्याची डिजिटल प्रत दिली जाईल. तसेच पोर्तुगीज दस्तावेजांचे भाषांतर करण्यात येणार आहे. तसेच खात्याची जुनी इमारत मळा येथे असून तेथे नवीन इमारत बांधू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. सध्या नव्या इमारतीत जागा दिल्याबद्दल आकाश खंवटे यांचे आभारी आहोत, असे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT