ED Raid Dainik Gomantak
गोवा

ED Raid: बँक फसवणूकप्रकरणी 'ईडी'चे 15 ठिकाणी छापे; गोव्यासह मुंबई, पुणे, चेन्नई येथे कारवाई

Goa Bank Fraud: छाप्यांदरम्यान ईडीने सुमारे २०० कोटी रुपयांची मालमत्ता दर्शवणारे कागदपत्र, अनेक डिजिटल उपकरणे आणि आठ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: तळवलकर बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड आणि संबंधित इतर बँक फसवणूक प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालयाने ९ जुलै रोजी गोव्यासह मुंबई, पुणे आणि चेन्नई येथील एकूण १५ ठिकाणी छापे टाकले होते.

पैशाच्या गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या छाप्यांदरम्यान ईडीने सुमारे २०० कोटी रुपयांची मालमत्ता दर्शवणारे कागदपत्र, अनेक डिजिटल उपकरणे आणि आठ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या छापासत्रात गोवा हे प्रमुख केंद्र असून तपास यंत्रणांनी येथूनही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती हस्तगत केली आहे. या बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहार, मालमत्तांची खरेदी-विक्री आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीविषयी तपशीलवार चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तळवलकर टालवॉकर फिटनेस कंपनीविरोधात याआधीच आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. या प्रकरणात काही बँक अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात असून ईडीच्या कारवाईमुळे चौकशीत वेग आला आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे. ईडीच्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे धणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT