Talpona Canacona Coast Guard police patroling boat Dainik Gomantak
गोवा

Goa Police Boat : पोलिसांची बोट बंद; समुद्रात दुर्घटना घडल्यावर बचावकार्य कसं राबवणार?

Goa Coastal Police: तळपण-काणकोण येथील पोलिसांची बोट गेली तीन वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे; कमी क्षमतेची बोट तटरक्षक दलाच्या दिमतीला देण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Talpona Canacona Coast Guard Police Patroling Boat

काणकोण: तळपण-काणकोण येथील तटरक्षक दल पोलिसांची बोट गेली तीन वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे. १.५० कोटी रुपयांची ही गस्तीची बोट दुरुस्त करणे शक्य नसल्याने ती तळपण जेटीवर भंगार अवस्थेत आहे.

तिच्या जागी हल्लीच कमी क्षमतेची नवीन बोट तटरक्षक दलाच्या दिमतीला देण्यात आली आहे. या तटरक्षक दलाकडे पोळे ते बेतुलपर्यत सागरी हालचालीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे.

हल्लीच तळपण नदीच्या मुखाशी एक मच्छीमारी बोट मच्छीमारासहित उलटली. मात्र ही तटरक्षक दलाची वादळी लाटांचा तडाखा सहन करीत घटनास्थळी पोहचू शकली नाही, त्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी आपल्या बोटीच्या साह्याने समुद्रात गटांगळ्या खात असलेल्या मच्छीमारांना व बोट सुखरूप किनाऱ्यावर आणली.

तीन वर्षापूर्वी मालपे-कर्नाटक येथील हायस्पीड बोटीनी तळपण समुद्राच्या पांच नॉटिकल‌ हद्दीत मासेमारी करण्यास सुरुवात केल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांना आपल्या बोटीवर घेऊन समुद्रात त्यांचा पाठलाग केला होता. तळपण नदीचे पात्र गाळमुक्त करण्याची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही, अशी माहिती मच्छीमारांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT