Taligao Water Crisis Dainik Gomantak
गोवा

Taligao Water Crisis: ताळगावातील पाणी प्रश्न पेटला; स्थानिकांच्या पाण्यावर गृहनिर्माण प्रकल्पांचा डल्ला!

Taligao Residents Water Problem: पंचायतक्षेत्रातील गृहनिर्माण प्रकल्प ताळगावातील पाण्यावर डल्ला मारत असल्याचा आरोप वारंवार ग्रामसभेत करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Taligao Water Crisis Housing Projects Impact

पणजी: ताळगाव पंचायत क्षेत्रातील लोकांची पाण्याची समस्या कधी सुटणार माहीत नाही. मात्र, पंचायतक्षेत्रातील गृहनिर्माण प्रकल्प ताळगावातील पाण्यावर डल्ला मारत असल्याचा आरोप वारंवार ग्रामसभेत करण्यात आला आहे. तरही प्रकल्प उभारण्यावर काहीही निर्बंध राहिले नसून, स्वतंत्र मोठ्या क्षमतेची पाण्याची टाकी या परिसरात उभारल्याशिवाय पाण्याचा प्रश्न सुटणार नाही.

पणजी (Panaji) शहराला लागून असलेल्या ताळगाव परिसरात फ्लॅट घेणे किंवा घर बांधण्यावर अनेकांचा कल असतो. सध्या या भागात अनेक सदनिकांच्या इमारती उभारल्या जात आहे. त्यामुळे या ठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या लोकांची पाण्याची मागणी भागवण्याचा ताण सार्वजनिक बांधकाम खात्यावर येऊन पडणार आहे. अगोदरच निर्माण झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे ताळगाव परिसरात एक तासभरही पाणी व्यवस्थितपणे नळाला येत नाही. त्यामुळे मूळ गोमंतकीयांना पाण्यासाठी टँकरवर विसंबून रहावे लागते.

ताळगावातील पाण्याच्या (Water) समस्या सतत ग्रामसभेत मांडण्यात येते. काही गृहनिर्माण प्रकल्पांना विरोध झाला तरी पंचायत उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाकडे (एनजीपीडीए) बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

टँकरमाफियांचा सुळसुळाट

पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय नव्या गृहनिर्माण सोसायट्यांना परवानगी देऊ नये, असा ठराव पंचायतीच्या ग्रामसभेत घेतला होता. मात्र, येथे सध्या उलट स्थिती आहे. पंचायत म्‍हणते, आम्ही गृहनिर्माण प्रकल्पांना परवानगी देत नाही, एनजीपीडीए देते. ताळगावात टँकरमाफिया वाढले आहेत. काही दिवसांनी लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.

- ॲड. भूपेश देसाई, ताळगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT