Goa Kamasutra Christmas event Dainik Gomantak
गोवा

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Goa Kamasutra Christmas event: २५ ते २८ डिसेंबरदरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आलेला वादग्रस्त 'टेल्‍स ऑफ कामसूत्रा' हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे.

Sameer Amunekar

२५ ते २८ डिसेंबरदरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आलेला वादग्रस्त 'टेल्‍स ऑफ कामसूत्रा' हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. आयोजकांनी याबाबत फेसबुक पोस्टद्वारे अधिकृत माहिती देत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरल्याचा दावा करत, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.

वाद वाढल्यानंतर गोवा पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी आयोजकांना कार्यक्रम रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारात्मक जाहिराती तत्काळ हटवण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर संबंधित जाहिराती थांबवण्यात आल्या आणि अखेर कार्यक्रम रद्द झाला.

आयोजकांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितले की, नागरिकांच्या भावना आणि सामाजिक दबाव लक्षात घेता ‘टेल्‍स ऑफ कामसूत्रा’ हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यक्रमाविषयी गैरसमज झाल्‍याचा दावा करत आयोजकांनी भावना दुखावल्‍या असल्‍यास दिलगिरी व्‍यक्‍त करत असल्‍याचा उल्‍लेख पोस्टमध्ये केला आहे.

या कार्यक्रमावर ‘गोवा महिला मंचाने’ (Goa Women’s Forum - GWF) या कार्यक्रमामुळे गोव्याची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता वर्तवली होती. गोव्याची ओळख ‘कौटुंबिक पर्यटन स्थळ’ म्हणून असून, अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे ती ‘लैंगिक पर्यटन स्थळ’ म्हणून होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

गोवा महिला मंचाच्या निमंत्रक लॉर्ना फर्नांडिस यांनी राज्याचे पर्यटन संचालक केदार नाईक यांना याबाबत एक सविस्तर पत्र लिहिले होते. या पत्रानुसार, अशा प्रकारच्या उपक्रमांना गोव्यात प्रोत्साहन देणे अत्यंत निषेधार्ह आहे. हा कार्यक्रम म्हणजे गोव्याच्या संस्कृतीचे आणि येथील लोकांच्या भावनांचे विकृत सादरीकरण करण्यासारखे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT