Taleigao Gram Sabha Dispute Dainik Gomantak
गोवा

चित्रिकरण केल्याने ताळगाव ग्रामसभेत माजी पंचाच्या मुलाचा राडा; सत्ताधारी - विरोधकांत ‘तू तू-मै-मै’

Taleigao Panchayat: खराब रस्ते, पाण्याची समस्या आणि २५० सदनिकांच्या प्रकल्पाचे मुद्दे ग्रामसभेत उपस्थितांनी मांडले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ताळगावातील खराब झालेले रस्ते, त्याचबरोबर पाण्याची समस्या आणि येऊ घातलेल्या २५० सदनिकांच्या प्रकल्पाचे मुद्दे रविवारी झालेल्या ग्रामसभेत उपस्थितांनी मांडले. परंतु चिकन कचऱ्याच्या मुद्यावर माजी पंच सदस्याच्या मुलाचे चित्रिकरण केल्याने त्याला त्याने हरकत घेतली आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत ‘तू तू-मै-मै’ झाल्याने वातावरण तंग झाले.

ताळगावात मल्टिपर्पज हॉलमध्ये सरपंच मारिया फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. या सभेत ॲड. पुंडलिक रायकर, सिसील रॉड्रिग्स, फ्रान्सिस कुएल्हो, भुपेश प्रभुदेसाई यांच्यासह इतरांनी समस्या मांडल्या. माजी पंचांचे चिरंजीव टोनी बार्रेटो हे बोलताना एकाने त्याचे चित्रिकरण केले, त्याला टोनी यांनी हस्तक्षेप घेऊन त्याला जाब विचारला. सर्वजण त्याचा मोबाईल हिसकावयला धावल्याने विरोधकांचा गट त्याला वाचवायला गेला. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चकमक झाली.

रस्ता रुंदीकरण महत्त्वाचे; सरपंच

ताळगाव पंचायतीत पाण्याचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी हा विषय विधानसभेतही मांडला आहे. पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची समस्याही पुढे आली आहे. त्याशिवाय काही ठिकाणी अरुंद रस्ते आहेत, त्यामुळे रस्त्याच्या बाजूच्या घरातील गाडी रस्त्यावर पार्क केल्यावर ये-जा करण्यास अडचणी येतात. त्यामुळे रस्ते किमान दहा मीटर रुंद करावेत, अशी सूचनाही पुढे आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT