Taleigao Panchayat voting  Dainik Gomantak
गोवा

Taleigao Panchayat voting : ताळगावात आज मतदान ; बाबूश यांची प्रतिष्ठा पणाला

Taleigao Panchayat voting : त्यासाठी पंचायतीत कसल्याही स्थितीत सत्ता आणण्यासाठी लोकसभेचा प्रचार सोडून पंचायतीच्या प्रचारात बाबूश मोन्सेरात यांनी रस घेतला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Taleigao Panchayat voting :

पणजी, ताळगाव मतदारसंघावरील दबदबा कायम ठेवायचा असेल तर पंचायत ताब्यात ठेवणे आवश्‍यक आहे.

त्यासाठी पंचायतीत कसल्याही स्थितीत सत्ता आणण्यासाठी लोकसभेचा प्रचार सोडून पंचायतीच्या प्रचारात बाबूश मोन्सेरात यांनी रस घेतला आहे. रविवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत उर्वरित सात जागांसाठी १७ केंद्रांवर ११ हजार ९८८ मतदार हक्क बजावून पसंतीचा उमेदवार निवडून आणतील.

ताळगावचा गड राखण्यासाठी मंत्री बाबूश यांनी प्रचार काळात स्वतःकडे निवडणुकीची सर्व सूत्रे ठेवली होती. त्यामुळेच ताळगावात ११ सदस्य संख्या असलेल्या पंचायतीत चार जागांवर मंत्री मोन्सेरात बिनविरोध सदस्य निवडून आणण्यात यशस्वी झालेत. मात्र, सात ठिकाणी त्यांना लढत द्यावी लागणार आहे. या सातपैकी तरी तीन जागा सत्ता राखण्यासाठी पुरेशा असल्या तरी सर्व जागांवर आपल्याच पॅनलचा उमेदवार निवडून यावा, यासाठी स्वतः बाबूश यांना मैदानात उतरावे लागले आहे.

ताळगाव पंचायतीला जेवढे मतदान होईल आणि त्यातील जेवढी बाबूश यांच्या ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंट''ला मिळतील, त्यापेक्षा काही अंशी अधिक मते लोकसभेला भाजप उमेदवाराला पडतील, असा कयास या गटाकडून बांधला जात आहे.

दिग्गजांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष

‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह'कडून रिंगणात असणारे विद्यमान सरपंच जानू रुझारिओ, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आग्नेलो डिकुन्हा, माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा पंच सदस्य सिडनी बार्रेटो यांच्या लढतीकडे लक्ष असणार आहे. ‘ताळगाव प्रोग्रेसिव्ह'ला यावर्षी सर्वपक्षीय ‘युनायटेड ताळगावकर्स'चे आव्हान आहे. सात जागांवरील ही लढत बाबूश मोन्सेरात यांचे प्राबल्य कमी झाले की वाढले, हे दर्शविणारी असेल.

यंदा मतदानाचा टक्का वाढणार?

गत निवडणुकीत २०१९ मध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. त्यावेळी १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १६ हजार २०९ मतदारांपैकी ११ हजार ४९२ मतदारांनी हक्क बजावला होता. म्हणजेच ७०.९० टक्के मतदान झाले होते. यावेळी सात जागांसाठी ११ हजार ९८८ मतदारांपैकी किती टक्के मतदार मतदानाचा हक्क बजावतात, ते पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

PM Modi Song: एक कर्मयोगी जो... मोदींवर आलं मराठी गाणं; अजय-अतुलनं दिलं संगीत; प्रमोद सावंतांनी शेअर केला व्हिडिओ Watch Video

ICC T20 क्रमवारीत मोठा फेरबदल! अभिषेक शर्मा नंबर 1 वर कायम तर सूर्या-तिलक वर्मा यांची घसरण

SCROLL FOR NEXT