Goa Taleigao Buffalo Slaughter Case X
गोवा

Taleigao Crime: ताळगावात म्हशीची कत्तल; सहाजणांना अटक, वादातून प्रकार घडल्याची चर्चा

Taleigao Buffalo Slaughter Case: घटनास्थळावरून कत्तल केलेल्या म्हशीचे पिशव्यामध्ये भरण्यात आलेले मांस तसेच कत्तलसाठी वापरण्यात आलेली अवजारे पणजी पोलिसांनी जप्त केली आहेत. प्रथमश्रेणी न्यायालयाने संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Taleigao Buffalo Slaughter Case

पणजी: ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरच्या मागील बाजूला शेताजमिनीतील पंप हाऊसमध्ये करण्यात आलेल्या म्हशीच्या कत्तलप्रकरणी पणजी पोलिसांनी ताळगावातील सहाजणांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३२५ खाली गुन्हा दाखल करून त्यांना आज सकाळी अटक केली. घटनास्थळावरून कत्तल केलेल्या म्हशीचे पिशव्यामध्ये भरण्यात आलेले मांस तसेच कत्तलसाठी वापरण्यात आलेली अवजारे पणजी पोलिसांनी जप्त केली आहेत. प्रथमश्रेणी न्यायालयाने संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताळगाव येथील एका पंपहाऊसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गुरांची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी नेण्याच्या तयारी काही व्यक्तींनी चालविली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्वरित पोलिसांनी सकाळी या घटनास्थळी धाव घेतली तेव्हा तेथे एका म्हैशीची कत्तल करून तेथे मांस सिमेंटच्या प्लास्टीक पिशव्यांमध्ये जमा केलेले होते. एक म्हैस त्या ठिकाणी जिवंत होती. कत्तलसाठी वापरण्यात आलेले चाकू, स्लेट हॅमर व कोयता घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या कत्तलप्रकरणी ६ जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये नॅथन डिसोझा (२० वर्षे, कार्दोजवाडा - ताळगाव), बबलू सोनार (२५ वर्षे, ओयतियान - ताळगाव), सुदर्शन शहा (१८ वर्षे, ओयतियान - ताळगाव), दिपक गणेश विश्‍वकर्मा (५२ वर्षे, नागाळी हिल्स - ताळगाव), भूपेश मोहन कराला (४२ वर्षे, करंंझाळे) व कमल सिंग (पर्वरी) याचा समावेश आहे.

वादातून प्रकार घडल्याचाही संशय

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले मांसाची तपासणी करण्यासाठी ते करंझाळे येथील पशुसंवर्धन इस्पितळात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सूरज मडगावकर करत आहेत. यामधील एका संशयिताचा संबंध एका राजकीय पक्षाशी असल्याने पोलिसांनी या घटनेची माहिती तसेच त्यात गुंतलेल्यांची नावे देण्यास टोलवाटोलवी केली. काही दिवसांपूर्वी शेतीची नासधूस करणाऱ्या एका म्हैशीला पकडून पोलिस स्थानकात आणले होते. त्या म्हैशीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची काही शेतजमीन मालकांनी केली होती. त्या वादातून हा प्रकार घडला आहे का त्याचीही चौकशी पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT