Suspicious Youth Filming In Canacona Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Police Complaint: काणकोण तालुक्यात संशयित हालचाली, दोन युवक कराताहेत प्रत्येक घराचे चित्रिकारण

Suspicious Youth Filming In Canacona: दोघे युवक काणकोण तालुक्यात घरोघरी दुचाकीने फिरून चित्रीकरण करण्याचे काम करत असल्याची तक्रार पैंगीणचे पंच सतीश पैंगीणकर यांनी काणकोणच्या पोलिस ठाण्यात दाखल‌ केली.

गोमन्तक डिजिटल टीम

आगोंद: गोव्यात काही ठिकाणी शाखा कार्यालये असल्याचे सांगून दोघे युवक काणकोण तालुक्यात घरोघरी दुचाकीने फिरून चित्रीकरण करण्याचे काम करत असल्याची तक्रार पैंगीणचे पंच सतीश पैंगीणकर यांनी काणकोणच्या पोलिस ठाण्यात दाखल‌ केली. तसेच तक्रारी सोबत संशयित युवक व त्यांच्या दुचाकीचे छायाचित्र जोडले आहे.

कोंन्सियस इंजिनिअरिंग सर्विस, सुरत, गुजरात येथे मुख्य कार्यालय तर साई शिवम पब्लिक स्कूलजवळ पाटणा, बिहार आणि नागाळी हिल्स कोलोनी, दोनापावल, तिसवाडी, या ठिकाणी शाखा कार्यालये असल्याचे सांगणाऱ्या या युवकांसंबंधीची तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी चित्रीकरण करत असलेल्या पैंगीण येथे पोलिसांना पाठवले. मात्र तत्पूर्वीच ते दोघेही तिथून पसार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

उपलब्ध माहितीनुसार हे दोघेही युवक अनोळखी असून‌ ते कसले व कोणासाठी असल्याप्रकारचे सर्वेक्षण करत आहेत याची माहिती न देता, रस्त्याशेजारी असलेल्या दुकानांचे, घरी जाऊन चित्रीकरण करत आहेत.

राज्य सरकारने जर कुणाला अशा प्रकारचे काम एजन्सीला दिलेले असेल तर त्याची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात, मामलेदार किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयाला द्यायला हवी होती, अशा प्रतिक्रिया याठिकाणी व्यक्त होत आहेत. दरम्यान, अशा अनोळखी व्यक्तींना कुणीच थारा देऊ नये, कसलीच माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक हरीश राऊत देसाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT