woman's Murder Dainik Gomantak
गोवा

सावर्डे परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू

हा खून की अपघाती मृत्यू असा संभ्रम निर्माण झाला आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव : गुड्डेमळ सावर्डे येथे रस्त्याच्या कडेला एका सुमारे 50 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. या महिलेचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता असून  हा खून की अपघाती मृत्यू असा संभ्रम निर्माण झाला आहे. (Suspicious death of a woman at Sanvordem)

हा मृतदेह गांधीनगर या भागातील जंगल सदृष्य जागेत आड रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा मृतदेह हॉस्पिसियो रूग्णालयात पाठवला असून हा खून की अपघाती मृत्यू हे शवंचिकित्सा केल्यानंतरच कळणार असे पोलिसांनी सांगितले. या महिलेच्या अंगावरील दागिने तसेच असल्याने हा चोरीसाठी केलेला खून असण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

आज दुपारी स्थानिकांनी आडवाटेला असलेला मृतदेह पाहिल्यावर पोलीसांना पाचारण केले. हा मृतदेह स्थानिकांपैकी नसल्याची माहिती असून तिच्या डोक्याला जखम झाल्याची खूण आहे. कदाचित खून करून नंतर हा मृतदेह या निर्जन जागेत आणून टाकला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पोलीस उप अधीक्षक संतोष देसाई यांना विचारले असता हा खुनाचा प्रकार असे वाटत नाही ही महिला खाली पडल्याने किंवा कुठल्यातरी वाहनाने तिला ठोकर दिल्याने तिचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. मृत्यूचे कारण शवंचिकित्सा केल्यावरच कळेल असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT