Chodan Murder Case  Dainik Gomantak
गोवा

चोडण येथे आढळला महिलेचा संशयास्पद मृत्यू

आत्महत्या की खून? शवचिकित्सेनंतर होणार कारण स्‍पष्‍ट

दैनिक गोमन्तक

पणजी : चोडण येथील भाडेपट्टीच्या खोलीत राहत असलेल्या ललिता नागेश सिद्धी (50) या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. तिने आत्महत्या केली की तिचा खून (Murder) झाला, याचे गूढ कायम आहे. मृतदेहाची उत्तरीय चाचणी उद्या केली जाणार असून त्यानंतरच त्याचा उलगडा होईल. प्रथमदर्शनी अनैसर्गिक मृत्यू म्‍हणून नोंद करण्यात आल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता हिचा मृतदेह जमिनीवर पडला होता, मात्र तिच्या गळ्याभोवती साडीचा एक तुकडा गुंडाळलेला होता तर त्या साडीचा दुसरा तुकडा लाकडाला बांधलेल्या स्थितीत होता. घरात कोणीही नव्हते. मृतदेह गोमेकॉ इस्पितळातील शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली असता तिचा पती नागेश सिद्धी याला अपघात झाल्याने त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू असल्‍याचे समजले. त्याची जबानी नोंदविल्यानंतरच पुढील तपासाची दिशा ठरविण्‍यात येणार आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत नागेश सिद्धी याने हल्लीच ललिता हिच्याशी लग्न केले होते व ते चोडण येथे भाड्याच्‍या खोलीत राहत होते. काल रात्री तो घरी परतला असता पत्नी साडीला लोंबकळत असल्याचे दिसले. त्याने लोंबकळत असलेली साडी कापून मृतदेह खाली काढला. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यासाठी तो वाहनाने जात असता त्याला अपघात झाला. उपचारांसाठी त्याला इस्पितळात दाखल करण्‍यात आले आहे.

सिद्धीच्या मृत्‍यूबाबत संशय असल्याने उपचार घेत असलेल्या नागेश याच्या इस्पितळातील वॉर्डबाहेर पोलिस ठेवण्यात आले आहेत. सकाळी शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पंचानामा करण्यात आला. कोणीही नातेवाईक नसल्याने शवचिकित्सा करण्यात आली नाही.

याप्रकरणी अधिक चौकशी केली असता मयत ललिता सिद्धी हिला पहिल्या पतीपासून दोन मुले असल्‍याचे समजते. ती कर्नाटकात असून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. तिचा पती नागेश सिद्धी याची जबानी नोंदविल्यानंतरच तसेच शवचिकित्सा अहवाल मिळाल्‍यानंतर निष्कर्ष काढला जाणार असल्याचे जुने गोवे पोलिसांनी (police) सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT