क्राईम सिन Dainik Gomantak
गोवा

Goa: तीघांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात 'पोलिसांवरचा संशय वाढला'

आत्महत्येच्या या घटनेवर गोमन्तकने उपस्थित केलेल्या 5 प्रश्नांचे उत्तर पोलीस (Goa Police) देणार का?

दैनिक गोमन्तक

पणजी: वेर्णा पोलिसांनी (Goa Police) चोरीच्या आरोपाखाली केलेली बेदम मारहाण आणि जाचामुळे झुआरीनगर, सांकवाळ येथील एमईएस कॉलेजच्या परिसरात भाडेपट्टीवर राहणाऱ्या कुटुंबातील हुलगप्पा अंबिगेरा (30), त्याची पत्नी देवम्मा अंबिगेरा (23) तसेच त्याचा भाऊ गंगाप्पा अंबिगेरा (25) या तिघांनी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास घडली. या घटनेत आता नवी माहिती समोर आली असुन या माहितीमुळे त्यामुळे पोलिसांवरील संशय अजुन बळावला आहे. (suspicious death case of the three raised suspicions among the police in verna)

हुलगपा, गंगाप्पा व देवम्मा या तिघा जणांनी आत्महत्या करण्यापूर्वी कन्नड भाषेमध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवलेली चिठ्ठी काल रात्री सापडली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज कुमार यांनी दिली. खोलीमध्ये ही चिठ्ठी पोलिसांना काल सकाळी का सापडली नाही हा संशय आता बळावला आहे. पोलिसांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी तसेच त्यांच्या जाचाला कंटाळून त्या तिघांनी आत्महत्या केली. हे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितल्याने पोलीस घाबरून गेले आहेत, म्हणुन पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे.

गोमन्तकचे पोलिसांना पाच प्रश्न

  1. पोलिसांकडून या परिवाराला मारहाण झाली की नाही, याची नि:पक्षपाती चौकशी पोलिस महासंचालक त्वरित करणार काय?

  2. चौकशी पूर्ण होऊन संबंधितांचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत त्यांना सेवेतून निलंबित करणार की नाही?

  3. केवळ तक्रारीच्या आधारेच त्या कुटुंबाला मारहाण झाली की पोलिसांकडे त्यांच्या विरोधात सबळ पुरावे होते?

  4. पोलिस अत्याचाराविषयीच्या आजवर आलेल्या किती तक्रारींची तटस्थ चौकशी उच्च स्तरावरून झाली? तिची फलश्रुती काय?

  5. एकाच कुटुंबातील तिघांवर आत्महत्येची वेळ का आली? कुणामुळे? आरोपीवर कारवाई होणार?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT