Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोसावीला दिलेल्या शिक्षेला स्थगिती

बलात्कार प्रकरण :निवाड्यात त्रुटी आढळल्याने सशर्त जामीन

गोमन्तक डिजिटल टीम

बलात्कारप्रकरणी दहा वर्षाची शिक्षा ठोठावलेल्या सिद्धार्थ ऊर्फ सिधू गोसावी याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवरील प्राथमिक सुनावणीवेळी न्यायालयाने त्याची ही शिक्षा स्थगित करीत त्याला सशर्त जामीन मंजूर केला.

पोक्सो कायद्याखालील जलदगती न्यायालयाने त्याला सुनावणीवेळी जामीन मंजूर केला होता मात्र त्याला शिक्षा सुनावल्यानंतर त्याची न्यायालयात रवानगी केली होती. त्याला कलम 363 खाली तीन वर्षे कैद, कलम 376 खाली 10 वर्षे कैद तसेच पोक्सो कायद्याखाली 10 वर्षाची शिक्षा दिली होती.

या तिन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या शिक्षेला सिद्धार्थ गोसावी याने आव्हान दिले होते. आव्हान अर्जावरील सुनावणीनंतर त्याचा अर्ज 21नोव्हेंबर 2022 रोजी खंडपीठाने दाखल करून घेतला होता.

शिक्षेला आव्हान दिलेल्या निवाड्यात काही त्रुटी आढळून येत असल्याने सिद्धार्थच्या शिक्षेला स्थगिती देणे योग्य आहे. यापूर्वी त्याला जामीन दिला गेला आहे तसेच त्याला कमाल 10 वर्षे शिक्षा देण्यात आली असल्याने आव्हान अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला तुरुंगात राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्या शिक्षेला स्थगिती देऊन त्याला जामीन देण्यात येत आहे.

दरम्यान, आरोपी सिद्धार्थ ऊर्फ सिधू याने वैयक्तिक 25 हजारांचा वैयक्तिक जामीन द्यावा तसेच तत्सम रक्कमेचे एक किंवा दोन हमीदार सादर करावेत. त्याने दर बुधवारी सकाळी 11 वा. हा आव्हान अर्ज निकालात काढण्यात येईपर्यंत वास्को पोलिस स्थानकात तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावावी.

त्याने तपास अधिकाऱ्यांना राहण्याचा पत्ता तसेच मोबाईल क्रमांक द्यावा. त्याने जर या दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्यास पोलिसांना त्याचा जामीन रद्द करण्यासाठी संबंधित न्यायालयाकडे अर्ज करण्यास मुभा असेल असे आदेशात खंडपीठाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT