Central Jail Colvale Goa Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: चौकशीविना 4 तुरूंग कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

Colvale Jail: अधीक्षकांकडून चुकीची कबुली : मात्र, जबाबदार असूनही प्रकरणावर पांघरूण

दैनिक गोमन्तक

Colvale Jail: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात रावण दहनासाठी फटाक्यांच्या वापरास परवानगी दिल्याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. या प्रकाराला कारागृह अधीक्षकांनीच मान्यता दिल्याने तसेच त्यांनी चूक मान्य केल्याने हे निलंबन आठवडाभरात मागे घेण्यात आले.

हा प्रकार गंभीर असूनही या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधीक्षकांना फक्त ताकीद देऊन सोडण्यात आले आहे. कारागृहात अनेक अनैतिक प्रकार घडत आहेत. मात्र, त्यावर पांघरूण घातले जाते, अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली.

दसऱ्याच्या दिवशी कारागृहात रावण प्रतिमा दहनासाठी फटाक्यांचा वापर केला होता. ही प्रतिमा जळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावेळी उपस्थित असलेले सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत हरिजन, जेलर महेश फडते व अनिल गावकर व सहाय्यक जेलर रामनाथ गावडे यांना निलंबित केले होते.

कायद्यातील नियमांकडे दुर्लक्ष

तुरुंग कायद्यातील नियमांनुसार ज्वलनशील वस्तू, हत्यारे तसेच टोकदार वस्तू कारागृहात नेण्यास बंदी आहे. यासंदर्भातची माहिती या निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना असूनही त्यांनी ती वरिष्ठांकडे उघड केली नाही. त्यांचे ते कर्तव्य होते. त्यामुळे त्यांच्यावरील हे निलंबन कोणतीही प्राथमिक चौकशी न होता, मागे घेतल्याने काही कारागृहातील कर्मचाऱ्यांकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

यादीत या वस्तूंचा समावेश

रावण दहनासाठी कारागृह अधीक्षक गौरीश कुट्टीकर यांनी कारागृहात नेण्यास ज्या साहित्याच्या यादीला मान्यता दिली होती, त्यात ३ किलो बेंडिंग वायर, २० गम स्टीक्स, १० मोठे बांबू, ६ फटाक्यांचे बॉक्स, रॉकेट रोषणाईचे एक बॉक्स, दोन कात्री, २ किलो दोरा व ५ मोठ्या टेप यांचा समावेश होता. या प्रकरणानंतर कारागृहातील प्रशासनाचे कामकाज आंधळेपणाने सुरू आहे हे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teacher Regularization: तासिका शिक्षकांना मोठा दिलासा! 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्यांना नियमित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Car Accident: टेनिस सामना खेळून परतताना काळाचा घाला! कारच्या भीषण अपघातात तीन खेळाडूंचा मृत्यू; 3 जण गंभीर जखमी

Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT