Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: उमेदवार निवडीचा ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Goa Politics: भाजपची दिल्‍लीत बैठक, घोषणा बाकी काँग्रेसचे शुक्रवारपर्यंत ‘वेट ॲण्ड वॉच’

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चितीसाठी भाजपने सोमवारी दिल्लीत बैठक घेतली खरी. मात्र, रात्री उशिरापर्यंत उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली नव्हती. दुसरीकडे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आता शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याविषयी केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर राज्यभरात कुतूहल निर्माण झाले आहे. त्याच्या उत्तरासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते. भाजप आपल्या उमेदवारांची दुसरी यादी उद्या (मंगळवारी) जाहीर करण्याची शक्यता आहे.

या यादीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे नाव असेल, असे सांगण्यात येत आहे. भाजपने प्रदेश पातळीवरून सुचविलेली नावे अमान्य झाल्याने महिला उमेदवाराचा शोध घ्या, अशी सूचना पक्षश्रेष्ठींनी केली होती. भाजपच्या तिसऱ्या यादीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव असू शकते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना वाटते. त्यामुळे येत्या आठवडाभरात बऱ्याच हालचाली होणार आहेत.

सार्दिनचा पत्ता कट होण्याचे संकेत

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना फेरउमेदवारी देण्याविषयी काँग्रेसमध्ये अनुकूल मत नाही. त्या मतदारसंघातून अल्पसंख्याक उमेदवाराचा विचार करावा, असा विचार काँग्रेसमध्ये सध्या सुरू आहे.

काँग्रेसला उत्तरेत हवा भंडारी चेहरा

काँग्रेसने उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची चर्चा अद्याप केंद्रीय निवडणूक समितीत केलेली नाही. उत्तर गोव्यातून तरुण भंडारी चेहरा उमेदवार म्हणून द्यावा, असा विचार काँग्रेसच्या एका घटकाने पुढे आणला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT