Goa DGP Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

Goa DGP: आसगाव प्रकरण गोवा डिजीपींना भोवणार? विरोधक आक्रमक; निलंबनासह सहआरोपी करण्याची मागणी

Assagao House Demolition Case: पोलिसांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात प्रशल देसाई यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

Pramod Yadav

गेल्या चार दिवसांपासून गोव्यात गाजत असलेल्या आसगाव घर मोडतोड प्रकरणाने नवे वळण घेतले असून, निलंबित करण्यात आलेल्या हणजूण पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांवर गंभीर आरोप केले आहेत.

कारावाईसाठी पोलिस महासंचालकांचा दबाव होता असा खळबळजनक खुलासा पोलिसांनी मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या अहवालातून केला आहे. यावरुन आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून डिजीपींच्या निलंबनासह त्यांना सहआरोपी करण्याची मागणी होत आहे.

आसगाव प्रकरणात हणजूण पोलिस निरीक्षक प्रशल देसाई, उप-निरीक्षक नितीन नाईक आणि संकेत पोखरे यांना निलंबित करण्यात आले. मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालाच्या चौकशीअंती ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी मुख्य सचिवांना सादर केलेल्या अहवालात प्रशल देसाई यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्यावर आसगाव येथील कारवाईसाठी पोलिस महासंचालकांचा दबाव होता, तसेच कारवाई थांबवली म्हणून त्यांनी आरडाओरड केली असेही त्यांनी या अहवालात म्हटले आहे.

कारवाई थांबवल्यानंतर डिजीपींना पणजीत बोलवून माझ्यावर खोट्या एनडीपीएस गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देखील असे पोलिसांनी मुख्य सचिवांकडे सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे आता पोलिस महासंचालक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

कोण काय म्हणाले?

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना निलंबित करुन त्यांची या प्रकरणात सह-आरोपी म्हणून नोंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते सुनील कवठणकर यांनी केली आहे. असे न केल्यास केंद्रीय गृह खात्याला पत्र लिहणार असल्याचे कवठणकर म्हणाले.

तर, गोव्याच्या पोलिस खात्यावरील विश्वास आता उडालेला असून, ते आता अधिकृत सुपारी घेणारे खाते झाले आहे‌, असा आरोप विजय सरदेसाई यांनी केला.

उत्पल पर्रीकर यांनी देखील जसपाल यांच्या ट्विटवर खडे बोल सुनावताना ट्विट करुन पोलिसांवरील उडालेला विश्वास पुन्हा येणार नाही त्यासाठी प्रत्यक्षात कारवाई करावी लागेल, असे उत्पल म्हणाले.

'पोलिस महासंचालकांचा सहभाग हे तर हिमनगाचे टोक आहे. भाजप ते महासंचालक या लिंकचा पण तपास व्हायला हवा. रिअल इस्टेट माफियाना भाजप संरक्षण देत आहे. मुख्यमंत्री मीडियाच्या प्रश्नांना का टाळतायेत? निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी गरजेची आहे,' असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT