Stray Dogs Virus Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Mission Rabies Goa: शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असतानाच, या कुत्र्यांना एका विचित्र ''व्हायरस''ची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असतानाच, या कुत्र्यांना एका विचित्र ''व्हायरस''ची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात काही कुत्री अशक्त होऊन मृत्यूमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे कुत्र्यांना ''व्हायरस''ची लागण झाल्याच्या संशयाला बळ मिळत आहे. ''मिशन रॅबीज'' या स्वयंसेवी संस्थेकडून (एनजीओ)ही तशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. शहरातील शांतारामनगर परिसरात या संशयित ''व्हायरस''चा प्रादुर्भाव अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या महिनाभरात या भागातील तीन भटकी कुत्री अचानक मृत्यूमुखी पडली आहेत. तर काही कुत्री अशक्त अवस्थेत भटकताना दिसून येत आहेत. दरम्यान, या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शांतारामनगर येथील रहिवासी विश्वास गावस आणि विनोद पळ यांनी केली आहे.

शहरात सध्या सर्वत्र भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, एक हजारांहून अधिक भटकी कुत्री असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कळपाकळपाने ही कुत्री शहरात दिवसरात्र फिरत असतात. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे अधूनमधून अपघातही घडतात. रात्रीच्या वेळी ही कुत्री मोठ्याने भुंकत असल्याने नागरिकांची झोपमोड होत असते. शहरातील भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चहा विकून महिन्याला 9 लाखांची बक्कळ कमाई! चहावाल्यानं सांगितलं यशाचं गमक; म्हणाला, 'PM मोदींच्या संघर्षातून घेतली प्रेरणा...'

Asgaon Water Crisis: आसगाव ग्रामसभेत पाणीटंचाईचा मुद्दा गाजला; बहुमजली प्रकल्पांना विरोध करत ग्रामस्थांचा एल्गार, अपुऱ्या पावसामुळे पाण्याचे दुर्भीक्ष

Colvale Central Jail: पाणीटंचाई, तुटलेली गटारे आणि डासांचा प्रादुर्भाव, कोलवाळ कारागृहात मानवाधिकार आयोगाची अचानक धडक; कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Scrub Typhus Spread In goa: गोव्यात 'स्क्रब टायफस'चा धोका वाढला! 827 जण बाधित; तिसवाडी, मुरगावात सर्वाधिक रुग्ण

Sarmanas Villagers Protest: ‘वेदान्ता’ची खनिज वाहतूक रोखली! सारमानसवासीय पुन्हा आक्रमक; चार तास वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT