Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Case: ‘हीट अँड रन’ प्रकरणातील संशयित वकील मद्य नशेत

Goa Accident Case: चाचणीत उघड गुन्ह्यांत जोडली अन्य कलमे

दैनिक गोमन्तक

Goa Accident Case: गिरी येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ‘हीट अँड रन’ अपघात प्रकरणातील संशयित ॲड. मिलिंद नाईक देसाई हे दारूच्या नशेत कार चालवत असल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे म्हापसा पोलिसांनी त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांत अजून कलमे जोडली आहेत. हा अपघात 15 ऑक्टोबरला घडलेला होता.

या अपघातनंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी देसाई यांना पकडून जिल्हा इस्पितळात दारू सेवनाच्या चाचणीसाठी नेले होते. या चाचणीत ते दारू प्यायले होते, असे स्पष्ट झाले आहे.

गिरी-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर ‘हीट अँड रन’ अपघातात म्हापशातील संतोष काल्ड्रिंक्सचे मालक प्रदीप नार्वेकर (६२) यांचा मृत्यू झाला होता. नार्वेकर हे 15 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता पर्वरीहून म्हापशाच्या दिशेने दुचाकीने येत होते.

गिरीतील टिकलो पेट्रोल पंपाजवळ एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि चालकाने जखमी नार्वेकर यांना तिथेच सोडून पळ काढला होता.

इस्पितळाच्या पॅथॉलोजी विभागाकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे संशयित वकील मिलिंद नाईक देसाई यांच्या विरोधातील गुन्ह्यात भादंसंच्या ३०४ व २०१ कलमाअंतर्गत खून, पुरावे नष्ट करणे ही कलमे जोडली आहेत. यापूर्वी पोलिसांनी भा.दं.सं.च्या २७९, ३०४ अ व मोटारवाहन कायदा कलम १८५, १३४ अ आणि १३४ ब अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.
-जिवबा दळवी, पोलिस उपअधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT