Goa Crime |Margao Mudrer Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावातील खुनाचे गूढ उकलले; दिल्ली कनेक्शन आले समोर

मडगावात 25 डिसेंबर 2018 रोजी हे खून प्रकरण घडले होते.

दैनिक गोमन्तक

Goa Crime: दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मडगाव कदंब बस स्थानकावर राहणाऱ्या शिवप्पा (40) या मूळ गदग (कर्नाटक) येथील युवकाच्या डोक्यावर दगड घालून त्याचा खून केल्याचा आरोप असलेल्या ओमप्रकाश चंद (40) या मूळ दिल्ली येथील संशयिताला काल अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी दोषी ठरविले.

या संशयिताचे म्हणणे आता गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी ऐकून घेतल्यावर त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

या प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी या प्रकरणी तपास लावला होता. या प्रकरणी पोलिसांची बाजू सरकारी वकील देवानंद कोरगावकर यांनी मांडली.

25 डिसेंबर 2018 रोजी घडली घटना

  •   25 डिसेंबर 2018 रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हे खून प्रकरण घडले होते. खून करून आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र कदंब बस स्थानकावर असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यावर त्याची छबी टिपली गेली.

  •   त्यावरून पोलिसांनी त्याला पकडले होते. नवलेश देसाई हे फातोर्डा पोलिस स्थानकाचे निरीक्षक असताना एकूण तीन खुनाच्या घटना नोंद झाल्या होत्या. त्या तिन्ही घटनांचा त्यांनी शिताफीने तपास लावून खुन्यांना शिक्षेपर्यंत पोहोचविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT