Toyaar Lake Chimbel | Unity Mall Chimbel Dainik Gomantak
गोवा

Chimbel Survey: चिंबलमधील 'तोयार'चे सर्वेक्षण पूर्ण! सरकारकडे अहवाल होणार जमा; मुख्‍यमंत्र्यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

Toyaar Lake Chimbel: चिंबलमधील तोयार तळे आणि प्रस्‍तावित युनिटी मॉलच्‍या जागेचे सर्वेक्षण करण्‍यासाठी नेमण्‍यात आलेल्‍या समितीने मंगळवारीही सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: चिंबलमधील तोयार तळे आणि प्रस्‍तावित युनिटी मॉलच्‍या जागेचे सर्वेक्षण करण्‍यासाठी नेमण्‍यात आलेल्‍या समितीने मंगळवारीही सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवले. बुधवारी सकाळी उर्वरित काम पूर्ण करून याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्‍यात येईल. त्‍यानंतर पुढील निर्णय सरकार घेईल, अशी माहिती समितीच्‍या सदस्‍यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.

केंद्र सरकार पुरस्‍कृत युनिटी मॉल प्रकल्‍प चिंबलमध्‍ये उभारण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला होता. परंतु, या प्रकल्‍पाचा चिंबलमधील तोयार तळ्यावर परिणाम होण्‍याचा धोका वर्तवत स्‍थानिकांनी गेल्‍या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन छेडले आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही आंदोलकांनी विधानसभेवर धडक दिली.

या आंदोलनानंतरही सरकारने या प्रकल्‍पाबाबत ठाम भूमिका घेतलेली होती. परंतु, त्‍यानंतर हा प्रकल्‍प उभा राहिल्‍यानंतर त्‍याचा तोयार तळ्यावर काही परिणाम होऊ शकतो का, हे जाणून घेण्‍यासाठी तोयार तळे आणि युनिटी मॉलच्‍या जागेचे तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण करण्‍याचा निर्णय मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला होता.

त्‍यानुसार गेल्‍या चार दिवसांपासून सुरू असलेले सर्वेक्षण मंगळवारी संपुष्‍टात आले आहे. तरीही यासंदर्भात स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या समितीतील तज्ज्ञ बुधवारी सकाळी पुन्‍हा पाहणी करून अंतिम अहवाल बुधवारीच सरकारला सादर करणार आहेत.

अहवालानंतर पुढील भूमिका; खोलकर

सरकारने नेमलेल्‍या तज्ज्ञांनी आमच्‍या मागणीनुसार सर्वेक्षण केले आहे. याबाबत ते सरकारला जो अहवाल सादर करतील तो पाहूनच आम्‍ही आमची पुढील भूमिका स्‍पष्‍ट करणार असल्‍याचे चिंबल येथील आंदोलक अजय खोलकर यांनी सांगितले.

बोंडवेल तळ्याबाबत राणेंशी चर्चा करूनच निर्णय

सांताक्रूझ येथील बोंडवेल तळ्यासंदर्भात स्‍थानिकांनी मांडलेले प्रश्‍‍न, समस्‍या मी ऐकून घेतल्‍या आहेत. याबाबत नगरनियोजन मंत्री (टीसीपी) विश्‍‍वजीत राणे यांच्‍यासोबत चर्चा करून सर्व प्रश्‍‍न सोडविले जातील, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

बोंडवेल तलावाच्या १५० मीटर परिघातील सर्व विकासकामांवर बंदी घालण्‍यासह तलावाचे संरक्षण करण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध मागण्‍या स्‍थानिकांनी आमदार रुडॉल्‍फ फर्नांडिस यांच्‍याकडे केल्‍या होत्‍या.

त्‍यांच्‍या मागण्‍यांची दखल घेत आमदार रुडॉल्‍फ यांनी त्‍यांच्‍यासह मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांची आल्‍तिनो येथील शासकीय निवासस्‍थानी भेट घेत याबाबत चर्चा केली. त्‍यावेळी नगरनियोजन मंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्‍याशी चर्चा करून स्‍थानिकांच्‍या सर्व मागण्‍या मान्‍य करण्‍यात येतील.

बोंडवेल तळ्याभोवती झोन जाहीर करायचा असेल तर वेटलॅण्ड प्राधिकरणाशी चर्चा करून तोही जाहीर केला जाईल, असेही मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले. मुख्‍यमंत्री आपल्‍या मागण्‍यांची निश्‍चित दखल घेतील, असा विश्‍‍वास आमदार फर्नांडिस आणि स्‍थानिकांनी व्‍यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT