Chilies  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात मिरची चढ्या दरांमुळेच तिखट!

गावठी, ब्याडगी, संकेश्‍वरीचा भावही वधारला

दैनिक गोमन्तक

पणजी: पावासाळ्यापूर्वी मिरची घेऊन मसाला तयार करणे, आंब्याचे लोणचे करणे, पापड तयार करणे या साऱ्याची लगबग घरोघरी सुरू झाली आहे. एप्रिल लागला की मिरची खरेदी करून ती वाळविणे, तयार मिरच्या साफ करून मसाला भाजून तो मिसळणे, आदी कामांना वेग येतो.

गोव्यात पिकणारी काणकोण तसेच हरमलच्या मिरचीचे दर देखील वाढले आहेत. तसेच बेळगावहून येणाऱ्या ब्याडगी, काश्‍मिरी, तेजयासारख्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दराच्या बाबतीतही मिरची तिखटच आहे.

पणजी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या मिरच्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने गोव्यातील गावठी मिरची, तेजा, ब्याडगी, बटन, काश्‍मिरी,संकेश्‍वरी, गुंतूर अशा विविध प्रकारच्या मिरच्या उपलब्ध आहेत. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने महिलांची मिरच्या खरेदीची लगबग वाढली आहे. दरवर्षीच मार्चनंतर पहिली काढणी असल्याने चढ्या दरातच मिरची विकली जाते. परिणामी एप्रिलच्या सुरूवातीला मिरचीचे दर वाढलेले असतात.

मिरच्या (Chilli) घेऊन त्या वाळवाव्या लागतात,त्यामुळे एप्रिलच्या मध्यावर मिरच्या खरेदीवर सर्वांचा भर असतो. तिसऱ्या, चौथ्या काढणीनंतर मिरच्यांच्या दरात घसरण होते. मात्र यंदा मिरची पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे यंदा मिरची चढ्या दरातच खरेदी करावी लागण्याची शक्यता आहे.एरवी 600 ते 700 ने मिळणारी गावठी मिरची सध्या 800 ते 850 रुपये दराने विकली जात आहे. अवकाळी पावसाचाही (Rain) परिणाम मिरची पिकावर झाल्याचे सांगितले जात आहे. नंतर-नंतर दरात घट होण्यास सुरूवात होते. मात्र सध्या मिरच्या वाळवण्यासाठी खरेदीची लगबग सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT