Goa Covid Updates Dainik Gomantak
गोवा

गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; सरकारचे नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन

राज्यात मान्सूनलाही सुरुवात झाली असून मागील दोन दिवस जाेरदार पाऊस पडत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 57 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे सक्रिय करोना रुग्णांची संख्या आता 473 वर पोहचली आहे. (Goa Covid Updates)

आरोग्य खात्याने नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मागील काही महिन्यांपासून करोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे निदर्शनात येते. मात्र, आता परत रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

दरम्यान, राज्यात मान्सूनलाही सुरुवात झाली असून मागील दोन दिवस जाेरदार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात 12 करोना रुग्ण सक्रिय होते. पण गेल्या आठवड्यापासून करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून सक्रिय रुग्णांचा आकडा 473 वर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT