Goa Court Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजीतील मांसविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश, सुप्रीम कोर्टाने फेटाळली मनपाची याचिका

Panaji Meat Vendors: आव्हान याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने मनपाला उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत मांसविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Sameer Panditrao

पणजी: पणजी बाजारातील जीर्ण झालेली इमारत सुरक्षिततेच्या कारणास्‍तव महापालिकेने जमीनदोस्त केली होती.त्यावेळी या इमारतीत परवानाधारक असलेल्या मांसविक्रेत्यांचे पर्यायी जागी स्थलांतर न करता त्यांना तेथून हटविण्यात आले होते.

त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मनपाचे कान पिळत उदरनिर्वाहाचा विचार करून त्यांना जागा देण्याचे सूचित केले होते. या आदेशाला मनपाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही आव्हान याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने मनपाला उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत मांसविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयातही महानगरपालिकेची बाजू कमकुवत दिसून आली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांमुळे आता महानगरपालिकेला मांसविक्रेत्यांचे पुनर्वसन करावेच लागणार आहे. मासळी मार्केटची शेड हटविल्यानंतर मासळीविक्रेत्यांना पर्यायी शेडची महानगरपालिकेने उभारणी करून दिली. परंतु मांसविक्रेत्यांचा अजिबात विचार केला नाही. शिवाय हे मांसविक्रेते परवाना घेऊन नियमानुसार नूतनीकरण करून घेत होते. त्यामुळे त्यातून महानगरपालिकेला महसूलही मिळत होता. त्‍यामुळेच त्‍यांची बाजू न्यायालयात मजबूत होती.

उच्च न्यायालयाने विक्रेत्यांची बाजू उचलून धरून महानगरपालिकेला खडे बोल सुनावले होते. सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मजबूत व्हावी म्हणून मागील आठवड्यात (२४ जानेवारी) महानगरपालिकेने तातडीने बैठक घेऊन मांसविक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता. तो ठराव सर्वोच्च न्यायालयातही सादर करण्यात आला. मांसविक्रेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सुविधांची मागणी केली, ती मागणी न्यायालयाने मंजूर केली. त्यामुळे आता महानगरपालिकेला मांसविक्रेत्यांचे पुनवर्सन केल्याशिवाय पर्याय राहिला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

SCROLL FOR NEXT