Mining In Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: बेवारस, मोजमाप न केलेल्या खनिजसाठा लिलावास परवानगी; राज्य सरकारला दिलासा

Goa Government: सरकारने १.९४ दशलक्ष टन खनिज मालाचा लिलाव करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील खाणक्षेत्राच्या परिसरात बेवारस पडून असलेला व ज्याची यापूर्वी मोजमाप झालेली नाही, त्या खनिजसाठ्याचा लिलाव करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.

गोवा फाऊंडेशन विरुद्ध केंद्र सरकार तसेच इतरांच्या याचिकेत राज्य सरकारने अर्ज केला होता. या अर्जात सरकारने १.९४ दशलक्ष टन खनिज मालाचा लिलाव करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.

खाण खात्याने राज्यातील विविध खाणक्षेत्रांची तपासणी केली. या तपासणीत आणखी सुमारे १.९४ दशलक्ष टन खनिज साठा विविध ठिकाणी बेवारस पडून आहे अशी माहिती दिली. या सुनावणीवेळी ॲमिकस क्युरी ए. डी. एन. राव यांनी परवानगीला हरकत नाही, असे स्पष्ट केले. या लिलावातून मिळणारी संपूर्ण रक्कम ही खाणमालकांच्या नव्हे, तर राज्य सरकारच्या तिजोरीतच जाणार आहे.

गोवा फाऊंडेशनच्या वकिलांनी त्याला हरकत घेतली. या लिलावाच्या प्रक्रियेतून जमा होणारी रक्कम ही सरकारच्या तिजोरीत जाणार असल्याने या अर्जाला मान्यता देण्यात येत आहे. राज्य सरकारने या जमा होणाऱ्या रकमेतील काही भाग खाणमालकांना दिला जाणार नाही, अशी माहिती दिली आहे ती हमी म्हणून स्वीकारण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

विकासाच्या हव्यासात निसर्गाचा श्वास गुदमरतोय!

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

SCROLL FOR NEXT